आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींची विक्री करणारी Lady डॉन घुंघट घेऊन आली समोर, म्हणाली- दिल्लीच्या नेत्यांना-अधिकाऱ्यांना विचारा मी कोण आहे ते?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची/सिमडेगा - झारखंडच्या मुलींची परराज्यात तस्करी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी वाँटेड प्रभा मिंज मुनी हिला गुरुवारी दिल्लीहून रांचीला आणले. राजधानी एक्स्प्रेसमधून उतरताच मीडियाला पाहून ती चिडली. अपशब्द बोलू लागली. कॅमेरासुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला सिमडेगाला नेण्यात आले. तेथेही तिचे नखरे सुरूच होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर ती सारखे दिल्लीतील मोठमोठ्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांची ओळख असल्याचा धाक दाखवत राहिली. स्वत:ला समाजसेवी आणि एनजीओ संचालक असल्याचे ती सांगते. तिने एकच धोशा लावला की, दिल्लीतील नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना विचारा की मी कोण आहे आणि काय करते?


खाक्या दाखवताच बसली गप्प...
तथापि, नंतर पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवला तेव्हा प्रभाची बडबड एकदम बंद झाली. रात्री उशिरापर्यंत डीएसपी स्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिची चौकशी करण्यात आली.


3 अल्पवयीन मुलींच्या तस्करीत वॉरंट

सिमडेगा जिल्ह्यातील बानो परिसरात प्रभा मिंजविरुद्ध 6 मे 2013 रोजी 3 अल्पवयीन मुलींना भुलवून महानगरला नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. याप्रकरणी अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टाने वॉरंट जारी केले होते.


स्पेशल टीम आणि सीआयडी चौकशीच्या तयारीत
सिमडेगा एसपींनी प्रभाच्या चौकशीसाठी डीएसपी स्तरीय एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वात स्पेशल टीम गठित केली आहे. जेणेकरून तिला तुरुंगात पाठवण्यापूर्वी आपल्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळतील. यामुळे गुरुवारी संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत आरोपी प्रभाची चौकशी झाली. आपली ओळख दाखवूनही काही फरक पडत नसल्याचे पाहून तिने बचावात्मक पवित्रा घ्यायला सुरुवात केली. काही प्रश्न टाळण्याचाही प्रयत्न केला. सीआयडीच्या एका अधिकाऱ्यानेही प्रभाला प्रश्न विचारले.


फेसबुकवर दिल्लीचे सीएम आणि अफसरों अधिकाऱ्यांचे फोटो
प्रभाचे स्वत:चे फेसबुक अकाउंट आहे. यावर तिने आपल्यासोबत अनेक फोटोज अपलोड करून ठेवलेले आहेत. अनेक फोटोंमध्ये ती पती रोहित मुनी आणि मुलगी दीपशिखासोबतही आहे. काही फोटोज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी पोलिस कमिश्नर बीएस बस्सी यांच्यासह इतर नेते आणि अधिकाऱ्यांसोबत आहेत. 

 

गरज पडल्यास आरोपीची कोठडी घेऊ
डीएसपी स्तरी अधिकाऱ्याच्या नेतृत्वात गठित टीम प्रभा मुनीची चौकशी करत आहे. ती स्वत:ला एनजीओ संचालिका असल्याचे सांगते. जेलमध्ये पाठवण्यापूर्वी मुलींच्या तस्करीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे तिला द्यावी लागतील. गरज भासल्यास रिमांडवरही घेतले जाईल.
-संजीव कुमार, एसपी, सिमडेगा. 

 

 

बातम्या आणखी आहेत...