• Home
  • News
  • Prabhas is changing the script of 'Jaan' due to failure of Saho

आगामी / 'साहो'च्या अपयशाने 'जान'ची स्क्रिप्ट बदलून घेत आहे प्रभास

हिंदी प्रेक्षकांनाही अपील करण्याचा आहे प्रयत्न...

दिव्य मराठी वेब

Sep 23,2019 11:06:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रभासच्या मागच्या 'साहो' चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तथापि, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर 147 कोटींचा व्यवसाय केला आणि दुसऱ्या आवृत्तीनेदेखील चांगली कमाई केली. मात्र त्याचे कथानक, संवाद आणि बऱ्याच गोष्टींना समीक्षकांनी धारेवर धरले. तथापि, आता प्रभासने या चित्रपटातून सावरत राधा कृष्ण दिग्दर्शित त्याच्या पुढच्या 'जान' चित्रपटावर लक्ष केंद्रित केले आहे. या सिनेमात प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


सूत्रानुसार, प्रभासने या चित्रपटाच्या निर्मात्यांना स्क्रिप्टमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. 'साहो' चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसाद आणि त्याची कमाई पाहून प्रभासने हा निर्णय घेतला आहे.


सूत्रानुसार, 'साहो चित्रपटानंतर इंडस्ट्रीमध्ये अभिनेता प्रभास जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. हा चित्रपट रोज नवीन विक्रम रचत आहे. अजूनही तो बऱ्याच ठिकाणी चित्रपटगृहात लागलेला आहे. प्रभासला या चित्रपटासाठी किती मानधन मिळाले हे ठोस सांगता येणार नाही मात्र त्याला या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये देण्यात आल्याचे बोलले जात आहे.


सूत्रानुसार, साहो चित्रपट तेलुगू प्रेक्षकांनादेखील आवडला नव्हता मात्र तो हिंदीबहुल पट्‌ट्यातील लोकांना आवडला. तेथेच या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली. मात्र या चित्रपटाच्या अपयशामुळे प्रभास सध्यातरी हिंदी चित्रपट करण्याच्या मन:स्थितीत नाही. त्याने दिग्दर्शकाला यात काही बदल करण्याचे सुचवले आहे, कारण तो चित्रपट हिंदी प्रेक्षकांनाही आवडावा.

X
COMMENT