Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | prabhate_kar_darshnam

प्रभाते करदर्शनम्मागील शास्त्र जाणून घ्या

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 26, 2011, 03:32 PM IST

दोन्ही हात जुळवून तळव्यांचे दर्शन घेऊनच अंथरुणातून बाहेर या.

  • prabhate_kar_darshnam

    हिंदू वैदिक परंपरेत दिवसाची सुरुवात दर्शनाने होते. परंतु हे दर्शन कुणाचे. भारतीय ऋषीमुनींनी सांगून ठेवले आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हातांकडे पाहा. हातांचे दर्शन घ्या. दोन्ही हात जुळवून तळव्यांचे दर्शन घेऊनच अंथरुणातून बाहेर या.
    हाताच्या बोटांकडील भागात लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि खालच्या भागात नारायण भगवंताचे स्थान असते, असे आपल्या संस्कृतीत सांगितले आहे. रामप्रहरी केवळ हातांचे दर्शन केल्यानेही तीन दिव्य शक्तींच्या दर्शनाचे पुण्य मिळते. प्रभाते करदर्शनम्ची परंपरा वैदिक आहे.
    हातांचेच दर्शन का ?
    भारतीय सनातन धर्म हा कर्मप्रधान आहे. भगवान श्रीकृष्णाने भगवदगीतेतून कर्माचे महत्त्व सांगितले आहे. हातच आपले प्रमुख कर्मेंद्रिय आहेत. हात कर्माचेच प्रतीक आहे. आपल्या क्षमता आणि पराक्रमाचे प्रतीक हातच तर आहेत. सकाळी हातांचे दर्शन करण्यामागचे तत्त्व असे आहे की आपण ईश्वराकडे आपल्या कर्मात शुचिता, पवित्रता आणि शक्ती येण्याची प्रार्थना करावी. केवळ नशिबावर भरवसा ठेवण्याएेवजी कर्मावर विश्वास ठेवा असाही संदेश यामागे आहे. जगतील सार:या सुखसोयी, वैभव आपल्याला हातानेच प्राप्त करता येतात. त्यामुळेच हातात लक्ष्मी, सरस्वती आणि नारायणाचे वास्तव्य मानले गेले आहे.


Trending