आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या जागा 282 हून कमी हाेतील, सत्तेच्या लालसेपाेटी मायावती आणि अखिलेश यादव येतील एकत्र : प्रभू चावला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांच्या मते २०१९ च्य लाेकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा २८२ हून कमी हाेतील, तर सत्तेसाठी मायावती व अखिलेश हे एकत्र येऊ शकतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर 'भास्कर'चे संताेष कुमार यांनी त्यांच्याशी चर्चा केली. 

 

प्रश्न : २०१९ मध्ये माेदींना पराभूत करणे अवघड अाहे का? 
उत्तर : हा प्रश्न विचारण्यापूर्वी अापण इतिहास लक्षात घेतला पाहिले. राजीव गांधी यांच्याविराेधात तेव्हा पर्याय नव्हता. मात्र, १९८९ मध्ये त्यांना केवळ २०० जागा मिळाल्या व सत्ता गेली. नरसिंह राव जेव्हा पराभूत झाले तेव्हाही त्यांच्यासमाेर काेणी सक्षम पर्याय नव्हता. २००४ मध्ये अटलजींना तरी काेणाचे अाव्हान हाेते. २००४ मध्ये मतदानाेत्तर चाचण्यांमध्ये एनडीएला ३५० जागा मिळतील, असे सांगितले जात हाेते, मात्र एप्रिलमध्ये त्यांना १४० जागाही मिळाल्या नाहीत. प्रादेशिक पक्षांना पाठिंबा न मिळाल्याने ते पराभूत झाले. अाता माेदींविराेधातही काेणी लाेकप्रिय सक्षम नेता नाही. परंतु विराेधकांनी प्रादेशिक पक्षांचे मजबूत संघटन केले तर माेदींना ते पराभूत करू शकतात. कारण २०१४ मध्ये माेदींची लाट असतानाही ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, जयललिता यांनी वर्चस्व कायम ठेवले हाेते. जिथे काँग्रेसचा प्रभाव नव्हता तिथे माेदी लाटेचा परिणाम जाणवला नाही. अाजही तशीच स्थिती अाहे. भाजपच्या जागा २८२ पेक्षा कमी हाेतील, यात शंका नाही. 

 

प्रश्न : उत्तर प्रदेशात सपा, बसप एकत्र येतील? 
उत्तर : मायावतींना राजकीय महत्त्वाकांक्षा प्रचंड अाहे. अखिलेश यांनाही संधी अाहे. अजून त्यांचे वय ४६ वर्षांपर्यंत अाहे. काही गाेष्टींत तडजाेड केल्याने प्रतिष्ठा वाढत असेल तर ताे फायदा त्यांना हवाच अाहे. काेणत्याही परिस्थितीत अाघाडी करायचे हे त्यांनी ठरवले अाहे. मायावती ४० जागा मागत असतील तरी ते देतील. मला वाटते काँग्रेसशीही ते अाघाडी करतील. अखिलेश काँग्रेसला २-४ जागा देऊ शकतात. शेवटच्या क्षणी सीबीअाय, ईडीचा काय परिणाम हाेईल ते सांगता येत नाही. मायावती १५ वर्षांपासून सत्तेपासून वंचित अाहेत. अाता त्यांना सत्ता हवी अाहे, अखिलेश यांनाही सत्ता हवी अाहे. हीच लालसा त्यांना एकत्र अाणेल. ममता, नवीन पटनायकही हेच करतील. कारण विराेधकांवरच छापे पडू शकतात. त्यांची अाघाडी झाली नाही तरी भाजपला पूर्वीसारखे यश मिळवणे अवघड अाहे. 

 

प्रश्न : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसारख्या राज्यांत भाजपला ५०% जागा मिळाल्या. त्या राज्यांत अाता भाजपचे नुकसान झाले तर ती भरपाई कुठून करतील? 
उत्तर : भाजपला अण्णाद्रमुककडून अाशा अाहे. जगन रेड्डी, टीअारएस यांच्याशीही युती हाेऊ शकते. म्हणजे ते नवीन पक्ष जाेडू शकतात. पश्चिम बंगाल, अाेडिशात भाजपला अाशा अाहे. तामिळनाडू, अांध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, अाेडिशावरच त्यांचे भवितव्य अवलंबून अाहे, मात्र मला नाही वाटत ते नुकसान भरून काढू शकतील. 

 

प्रश्न : सरकार जातीयता, कट्टरवाद वाढवत असल्याचा आरोप होतोय? 
उत्तर - देशाचा 'डीएनए' धर्मनिरपेक्ष अाहे. घाेषणाबाजी, टीव्हीवरील दृश्यांनी जातीयवाद वाढताेय, असे मी मानत नाही. काही लाेकांना भाजपवाले उचकावतात, त्यामुळे ध्रुवीकरण हाेत असल्यासारखे वाटते. मात्र, मला नाही वाटत की जातीयवाद वाढत अाहे. असहिष्णुता मात्र थाेडी वाढत अाहे, भाषेच्या अाधारावर.... 

 

प्रश्न- बिनचेहऱ्याचा विरोधी पक्ष मोदींचा मुकाबला करू शकेल का ? 
उत्तर- २००४ मध्ये काय झाले होते? आधी चेहरा विजयी होतो. त्यानंतर बिनचेहऱ्याचा विरोधी पक्षच विजयी होतो, हेच देशाचा इतिहास सांगतो. वाजपेयी हे त्यास अपवाद. कारगिल झाले नसते तर तेही कठीण होते. भारतीय राजकारण विचित्र आहे. चेहऱ्याला विजयी करणारे आणि नंतर बिनचेहरा म्हणून पराभूत करणारे आहे. १९७७ पासून हेच घडत आले आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, वाजपेयी इत्यादी उदाहरणे पाहा. त्यांच्याविरोधात फार मोठ्या गोष्टी नव्हत्या. पण ते नंतरच्या निवडणुकीत पराभूत ठरले होते. 

 

प्रश्न- मोदींना पूर्ण बहुमत न मिळाल्यास विरोधी गटातील उमेदवा कोण व का ? 
उत्तर - जास्त जागा असणारा पक्ष सर्वात मोठा दावेदार ठरेल. त्याची स्वीकारार्हता नसल्यास त्याच्यानंतरचा दुसरा पक्ष असेल. विश्वासार्ह वाटणे महत्त्वाचे आहे. त्यात कमी विश्वासू असलेले बाहेर पडतील व विश्वासार्ह पंतप्रधान होईल. मी शर्यतीतून बाहेर नसल्याचे राहुल यांनी पक्षांतर्गत स्पष्ट केले. आघाडीतील घटक पक्षांनी एकमताने ठरवल्यास पंतप्रधान होतील. नवा चेहराही असू शकतो. 

 

प्रश्न- काँग्रेसकडे मोदींविरोधातील कोणते मुद्दे आहेत, असे वाटते ? 
उत्तर- मोदी भाजपचे ब्रँड आहेत. या ब्रँडची विश्वासार्हता संपवणे हीच काँग्रेसची रणनीती आहे. विश्वासार्हता संपेपर्यंत मते मिळवता येणार नाहीत. म्हणूनच राहुल जाईल तेथे रफाल, अंबानीचा मुद्द्यावर बोलतात. राजीव गांधींवर ज्याप्रमाणे प्रश्न उपस्थित केले गेले होते. तसेच आरोप केले जात आहेत. राहुल त्याचा सूड आता घेत आहेत. ते जाईल तेथे मोदी चोरी अाहेत, असे म्हणतात. ही भाषा चुकीची आहे. दुसरा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्याला उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले गेले. सुटाबुटातील सरकार, काळा पैसा आला नाही, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल दरवाढीचेही मुद्दे आहेत. 

 

प्रश्न- २०१९ मध्ये भाजप कोणता मुद्दा घेऊन निवडणूक मैदानात उतरेल ? 
उत्तर- मोदी सत्तेवर आल्यापासून दहशतवादी कमी झाला. गेल्या साडे चार वर्षात काश्मीर वगळल्यास कोणतीही घटना घडली नाही. नक्षलवादही कमी झाला. भ्रष्टाचार झाला नाही. यशस्वी परराष्ट्र धोरण, पायाभूत क्षेत्रात काम, महागाईवर नियंंत्रण ठेवले. प्रामाणिक नेता, हीच भाजपची घोषणा असेल. 

 

प्रश्न- मोदी सरकारच्या दोन कामगिरी व दोन अपयशे सांगा ? 
उत्तर - सामाजिक सौहार्द. दंगल झालेली नाही. हे मोठे यश ठरले. यशस्वी परराष्ट्र धोरण, ट्रम्प यांचे भाषण भारताच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. मोदी बळकट नेते आहेत. गरिबी कमी झालेली नाही. काश्मीर प्रश्नही सुटला नाही. 

 

प्रश्न- सरकारचे आकडे खोटे वाटतात ? 
उत्तर- देशात अशा प्रकारचा आकड्यांचा खेळ चालू असल्याचे दिसते. जीडीपीचा फॉर्म्युला बदलला आहे. पाच कोटी एलपीजी सिलिंडरचे वाटप केले. त्याचा कंपनीला फायदा झाला. मात्र, सिलिंडर दुसऱ्यांदा भरून घेणे सामान्यांना कठीण जात आहे. ते महाग झाले. एक रुपयाचा विमा कोणालाही मिळालेला नाही. मोदी काम चांगले करतात. परंतु त्याची अंमलबजावणी कशी करायची याचा विचार करत नाहीत. 

 

प्रश्न- नोटबंदी,जीएसटीकडे कसे पाहता ? 
उत्तर - नोटबंदी तर अयशस्वी ठरली. काळा पैसा संपेल, रोखीचे वितरण, दहशतवाद संपेल, अशी त्याची संकल्पना होती. या सर्व पातळ्यावर काहीही यश मिळाले नाही. जीएसटीची अंमलबजावणी वाईट ठरली. 

 

प्रश्न- मीडियाची वाटणी झाली आहे. मोदीवादी किंवा मोदीविरोधी आहे. तुम्हाला काय वाटते ? 
उत्तर- मीडियाची नव्हे, पत्रकारांची वाटणी झाली आहे. बहुतांश पत्रकार एक तर लिबरल आहेत किंवा मोदीवादी आहेत. पत्रकारांत स्पर्धा दिसते. चमचेगिरी किंवा चाटूगिरी करण्याची चढाआेढ आहे. मोदींना मी ४० वर्षांपासून आेळखतो, असे काहींना वाटते. त्यांना सकारात्मकता हवी असावी. पत्रकारांमध्ये मोदीभक्त किंवा विरोधक आहेत. पत्रकारितेचे व्यावसायीकरण झाले आहे आणि चाटूगिरीची शर्यतही आहे. त्यासाठी एक तर मालक किंवा पत्रकार जबाबदार आहेत. मोदी जबाबदार नाहीत. 
 

बातम्या आणखी आहेत...