Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | pradhan mantri jan dhan yojana issue news in Marathi

प्रधानमंत्री जनधन योजनेचा बोजवारा : 16% निष्क्रिय, 16.45% खात्यांत खडकूही नाही

महेश जोशी | Update - Mar 02, 2019, 10:46 AM IST

प्रधानमंत्री जनधन योजनेचे खातेदार टिकवण्यासाठी आता नवीन आमिषे

 • pradhan mantri jan dhan yojana issue news in Marathi

  औरंगाबाद - केंद्र सरकारने गाजावाजा करत प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली. दबावामुळे देशातील बँकांनी कोट्यवधी खाती उघडली. मात्र, साडेचार वर्षांतच बोऱ्या वाजलाे. ३४.०३ कोटीपैकी १६.४५% खात्यांत एकही व्यवहार झालेला नाही. १५% खात्यात एक रुपयाही जमा नाही. १.९% खातेधारकांनी वर्षभरात खाते बंद केले. आता खातेदार टिकवून ठेवण्यासाठी सरकारने नवीन आमिषे देऊ केली आहेत. नोटबंदीच्या काळात या खात्यांचा मोठा वापर झाल्याने अनेकांना कारवाईची भीती आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीनंतर अनेकांनी काळा पैसा बाहेर काढला व ओळखीच्यांंच्या खात्यात जमा केला. ठेवी वाढल्या. ही वाढ काळ्या पैशांची असल्याचा आरोप आहे. यात अनेकांची चौकशीही झाली. काहींना चौकशीची भीती वाटत आहे.


  नागरिकांची अनास्था लक्षात घेऊन शासनाने ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी आता आमिषे देऊ केली आहेत. यात सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ५ हजारएेवजी १० हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जाणार आहे. यासाठी वयोमर्यादा ६५ करण्यात आली आहे. रुपे कार्डवरील विमा कवच १ वरून २ लाखांपर्यंत करण्यात आले आहे.


  खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड, अपघात विमाही
  - २८ ऑगस्ट २०१४ रोजी जनधन योजना सुरू झाली. याअंतर्गत प्रत्येक खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड आणि एक लाख रुपयांच्या अपघात विम्याचे संरक्षण देण्यात आले.


  - सहा महिने बँक खात्यांत समाधानकारक व्यवहार असल्यास ५ हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा तसेच पहिल्यांदा खाते उघडणाऱ्यास ३० हजार रुपयांचा जीवन विमाही देण्यात आला.


  - पीक विमा, गॅस सबसिडी अशा सरकारी योजनांचे अनुदान मिळवण्यासाठी हे खाते महत्त्वाचे ठरेल, असे सांगण्यात आल्याने नागरिकांनी ते उघडण्यासाठी रांगा लावल्या.


  बँकांचीही चतुराई
  टार्गेट पूर्ण करण्यासाठी बँकांकडे वेगवेगळ्या खात्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट कोड असतात. अनेक बँकांनी टार्गेट पूर्ण होत नसल्याने त्यांच्याकडील विद्यमान तसेच नवीन खात्यांना जनधन खात्याचा कोड टाकला. एखादा ग्राहक आलाच तर त्याला जनधनचे महत्त्व सांगून वेळ मारून नेली. किमान ५ कोटी खातेधारकांनी २-३ बँकांत खाती उघडली आहेत. देशभरात अशा पद्धतीने खात्यांची संख्या फुगल्याचा दावा अधिकाऱ्याने केला.


  योजना फसली
  तयारी अभावी योजना फसल्याचे दिसते. बँकांचे ३४ कोटी ग्राहक वाढले. पण त्यात पैसा जमा व्हावा म्हणून सरकारने पुढाकार घेतला नाही. उलट नंतर असंघटित क्षेत्रातील लोकांचे उत्पन्न घटले. - देविदास तुळजापूरकर, बँक क्षेत्राचे अभ्यासक

Trending