आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इक्बाल मिर्चीशी प्रफुल्ल पटेलांचे व्यावसायिक संबंध : ईडीचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बोलावले नसतानाही जाण्याचा निर्णय घेऊन शरद पवार यांनी राजकीय खळबळ माजवली होती. आता तर ईडीने शरद पवार यांचे अत्यंत घनिष्ठ मित्र व राष्ट्रवादीचे नेते, माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मेमन मिर्ची यांचे व्यावसायिक संबंध असल्याची माहिती मिळाल्याने चौकशी सुरू केली आहे. प्रफुल्ल पटेल यांची यापूर्वीही ईडीने विमान खरेदी घोटाळाप्रकरणी चौकशी केलेली आहे.

इक्बाल मेमन हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा निकटवर्तीय आहे. त्याच्या कंपनीशी प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत जमिनीचा व्यवहार केल्याची कागदपत्रे ईडीला मिळाली असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ईडीने दोन आठवड्यांपासून मुंबई व बंगळुरूत केलेल्या छापेमारीत मिळालेल्या माहितीच्या आधारे हा दावा केला जात आहे. 
 

कोण आहे इक्बाल मेमन?
इक्बाल मोहंमद मेेमन उर्फ इक्बाल मिर्ची दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने छोटा शकीलसाठी काम करण्यास सुरुवात केली व नंतर तो दाऊदच्या संपर्कात आला. इक्बाल मेमनला जुने वाडे, बंगले खरेदी करण्यात खूप रस होता. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटापूरिवी तो दाऊदसोबत पाकिस्तानला निघून गेला. त्याने नंतर लंडन येथून आपले काम सुरू ठेवले. लंडनमध्येच त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...