Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Prafulla Kadam to contests election against Sharad Pawar from Madha constituency

माढ्यात शरद पवार यांच्याविरोधात या नेत्याने ठोकला शड्डू..अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 11, 2019, 12:24 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

 • Prafulla Kadam to contests election against Sharad Pawar from Madha constituency

  सोलापूर- केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली. 11 एप्रिल ते 19 मेपर्यंत 7 टप्प्यांत 543 जागांसाठी मतदान हाेईल. 23 मे रोजी निकाल जाहीर होईल. निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

  शरद पवारांच्या विरोधात या नेत्याने ठोकला शड्डू..

  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पाणी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि वॉटर किसान आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी शरद पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. प्रफुल्ल कदम यांनी रविवारी पंढरपुरात आपल्या उमेदवारीची घोषणा केली. सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे मेळाव्यात कदम यांनी शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. कदम यांना शेतकरी आणि तरुण वर्गाने मोठा पाठिंबा दिला आहे.

  प्रफुल्ल कदम यांनी सांगितले की, माढा मतदारसंघातील 860 गावाशी, तिथल्या जनतेशी पाणी चळवळीमुळे आपला थेट संबंध आहे. माढा मतदारसंघात या निवडणुकीत इतिहास घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जनतेच्या निधीवर आणि पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचेही कदम यांनी यावेेळी जाहीर केले.

  शरद पवारांनी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून दिलेल्या एकही आश्वासन पाळले नाही..

  प्रफुल्ल कदम यांनी सांगितले की, शरद पवार यांनी 2009 च्या निवडणुकीत मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पाळले नाही. त्याचबरोबर कदम यांनी भाजपवरही टीका केली. भाजपचे उमेदवार म्हणजे 'नुरा कुस्ती'चे उमेदवार असल्याचे कदम म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघ दुष्काळाने होरपळला आहे. त्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे कदम यांनी सांगितले.

Trending