आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pragya Thakur Apologizes For Controversial Remarks On Godse, Live Updates From Rajya Sabha Lok Sabha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार प्रज्ञा ठाकुर यांनी गोडसेवर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली, चिट फंड्स बिल संसदेत पास झाले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मिरी नेत्यांची नजरकैद आणि नागरिकत्व बिलावरून संसदेत गोंधळ होण्याची शक्यता
  • गुरुवारी राज्यसभेत चिट फंड्स (संशोधन) विधेयक 2019 आवाजी मतदानाने मंजूर झाले
  • संसदेचे हिवाळी अधिवेशन 18 नोव्हेंबरपासून 13 डिसेंबरपर्यंत चालेल

नवी दिल्ली- संसदेतील हिवाळी अधिवेशनात आज(शुक्रवार) भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकुर यांनी नथूराम गोडसे वादापर लोकसभेत स्पष्टीकरण दिले. गुरुवारी त्यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार प्रदर्शन केले. प्रज्ञा यांनी बुधवारी द्रमुक नेते ए. राजा बोलत असताना महात्मा गांधींचा हत्यारा नथूराम गोडसेला देशभक्त म्हटले. यावर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना उत्तर मागितले. विरोधकांच्या गोंधळावर ट्विटरवरुन प्रज्ञा यांनी, "मी गोडसे नाही, क्रांतिकारी उधम सिंग यांचे नाव घेतले होते..." असे म्हटले.दुसरीकडे, विरोधक काश्मिरी नेत्यांना डांबून ठेवणे आणि नागरिकत्व संशोधन विधेयकावर मुद्दे उपस्थित करतील. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी अरुणाचल प्रदेशात एलएसी चीनने बळकावल्याप्रकरणी लोकसभेत स्थगन प्रस्ताव नोटिस दिली. द्रमुक खासदारांनी फारुक अब्दुल्लासहित अनेक काश्मिरी नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याप्रकरणी संसदेत प्रदर्शन केले. पुर्वोत्तरचे काँग्रेस खासदार आणि नगा पीपुल्स फ्रंटच्या खासदारांनी नागरिकत्व बिलाच्या मुद्द्यावरुन गांधींच्या पुतळ्याजवळ प्रदर्शन केले.

चिट फंड्स बिल संसदेत पास झाले
 
राज्यसभेत गुरुवारी चिट फंड्स (संशोधन) विधेयक 2019 ला आवाजी मतदानाने पास करण्यात आले. लोकसभेत हे बील 20 नोव्हेंबरलाच पास झाला होते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर नवीन संशोधित चिट फंड विधेयक लागू करण्यात आले. या नवीन विधेयकात चिट रक्कम तीनपट वाढवण्यात आली आहे.