आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pragya Thakur: Congress Party Tweet Reaction On BJP Lok Sabha Bhopal MP Pragya Singh Thakur Defence Ministry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेच्या संरक्षण विषयक समितीवर सल्लागार पदी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नियुक्ती!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीएम नरेंद्र मोदींनी साध्वींना मनातून माफ केलेलं दिसतंय -काँग्रेस
  • महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेंना म्हणाल्या होत्या देशभक्त

नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण विषयक संसदीय समितीवर साध्वी प्रज्ञा सिंह 
ठाकूर यांची नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. 21 सदस्यीय समितीमध्ये खासदार साध्वी यांना सल्लागार पद देण्यात येणार आहे. ही माहिती समोर येताच नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने देखील या विषयावर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी साध्वींना मनातून माफ केलेले दिसतेय असा टोला काँग्रेसने लगावला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पीएम मोदींनी साध्वींना मनातून माफ करणार नाही असे म्हटले होते.

काँग्रेसचे ट्वीट...

काँग्रेसने यानंतर एक बातमी ट्वीट करताना भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. "अखेर मोदीजींनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मनातून माफ केले! दहशतवादी हल्ल्याचे आरोप असलेल्या व्यक्तीला चक्क संरक्षण मंत्रालयाच्या समितीवर नेमण्यात आले आहे. ही नियुक्ती त्या वीर जवानांचा अपमान आहे, ज्यांनी दहशतवादी हल्ल्यांपासून या देशाचे संरक्षण केले."

महात्मा गांधींच्या मारेकऱ्याला म्हटले होते देशभक्त

खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवून भोपाळ मतदार संघातून खासदारकी मिळवली. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांना तब्बल 3.6 लाख मतांनी पराभूत केले. खासदार साध्वी प्रज्ञा यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यांच्या या विधानाने मोठा वाद निर्माण झाला होता.

बातम्या आणखी आहेत...