आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला डिटेंशन सेंटरमध्ये जायचे नसेल तर हे सरकार पाडा, मोदी शहांवर बरसले प्रकाश आंबेडकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून देशभरात विरोध आणि समर्थन सुरू आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे वतीने या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर टीका केली. सीएए आणि एनआरसी मुस्लिविरोधी असल्याचे ते म्हणाले. तुम्हाला डिटेंशन सेंटरमध्ये जायचे नसेल तर हे सरकार पाडा असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.नागरिक्त कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने मुंबईतील दादर टीटी येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान पक्षाचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सीएए आणि एनआरसी मुस्लिविरोधी आहे. हा कायदया म्हणजे संघ आणि भाजपचा कट आहे. अशाप्रकारे भाजप अराजकता माजवत आहे, सुधारित नागरिकत्व कायदा 40 टक्के हिंदूंविरोधात आहे. अनेक जणांकडे रहिवासी पुरावे नाहीत. अशावेळी डिटेंशन सेंटर उभारल्यास तोडून टाकू, दोन लाख जण मावतील इतके मोठे डिटेंशन सेंटर बांधले जात आहे, तिथे जायचे नसेल, तर मोदी सरकार पाडा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले आहे.