आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसशी युतीला तयार; राष्ट्रवादीशी मात्र नाहीच; प्रकाश अांबेडकरांची भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 'एमआयएम'ला सोबत घेऊन लढवण्यात येतील, या भूमिकेवर अापण ठाम अाहाेत. या पक्षाशी आघाडी कायम ठेवण्याबराेबरच जर काँग्रेसला आमची भूमिका मान्य असेल तर त्यांच्याशीही अाघाडी करण्याची अामची तयारी अाहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेससाेबत कदापिही जाणार नाही, असे स्पष्टीकरण भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. 


सरसंघचालक मोहन भागवत यांनी काँग्रेस, मुस्लिम आणि आरक्षणाबाबत केलेले घूमजाव म्हणजे आपण बदललो आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र अशा वक्तव्यातून ते समाजाची दिशाभूल करत अाहेत, असा अाराेपही प्रकाश अांबेडकर यांनी केला. अागामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची अशी नवी मुहूर्तमेढ रोवली आहे. या आघाडीच्या माध्यमातून दलित, मुस्लिम, धनगर यांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, काँग्रेससोबत आम्हाला युती करायची आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. परंतु काँग्रेसच्या मित्रांसोबत आघाडी करणार नाही. निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणे मात्र आम्हाला मंजूर नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आताही राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही याची खात्री त्यांनी काँग्रेसला द्यावी. मग आम्ही बघू.' 


शरद पवार धर्मनिरपेक्ष, मात्र त्यांचा राष्ट्रवादी पक्ष नाही 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत, मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे संभाजी भिडे यांची बाजू घेतात. मग आम्ही त्यांच्या प्रचाराला कसे जायचे, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी उपस्थित केला. 


एमअायएमलाही महाअाघाडीत घ्या : अांबेडकर 
महाअाघाडीसाठी भारिपलाही साेबत घेऊ, असे काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी सांगितले हाेते. त्याला प्रतिसाद देत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरेंची भेट घेतली. त्यांच्यात आघाडीबाबत चर्चा झाली. एमआयएमसोबतची आघाडी नक्की असल्याने महाआघाडीत एमआयएमला सामावून घ्यावे, अशी विनंती आंबेडकर यांनी या वेळी केली. मात्र, एमआयएमच्या संदर्भात दिल्लीतूनच निर्णय होऊ शकतो, असे काँग्रेस नेत्यांनी त्यांना सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...