आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रवादीत भिडेंची पिलावळ, त्‍यांच्‍यासोबत जाणे मंजूर नाही; प्रकाश आंबेडकरांचा पुन्‍हा शरद पवारांवर निशाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्‍यात MIM पक्षासोबतच आम्‍ही निवडणुका लढवणार आहोत, अशी घोषणा आज (गुरूवारी) भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी राष्‍ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्‍लाबोल करताना त्‍यांनी 'या पक्षात भिडेंची पिलावळ आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यासोबत जाणे आम्‍हाला मंजूर नाही', असे स्‍पष्‍ट केले. 'शरद पवार सेक्युलर आहेत, पण त्यांचा पक्ष तसा नाही. उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार?', असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी भाजप विरोधात काँग्रेस महाआघाडीलाही पांठिबा दर्शविला. काँग्रेससाठी आजही दरवाजे खुले असून निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत, असे त्‍यांनी म्‍हटले आहे. काँग्रेसचे नेते फोन करतात मात्र चर्चा होत नाही, अशी खंत त्‍यांनी बोलून दाखवली.

 

MIM-भारिप युतीचा चटका शिवसेनेला
शिवसेना आणि भाजपने वंचित बहुजनांना केवळ राजकीय फायद्यासाठी वापरले आहे. त्‍यांच्‍यासाठी भरीव असे काहीच केले नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. तसेच MIMशी आमच्‍या युतीचा सगळ्यात जास्त चटका शिवसेनेला बसला आहे. गेल्या ४० वर्षात माझ्यावर कधी अग्रलेख लिहिला गेला नाही, तो गेल्या १५ दिवसात लिहिला गेला, अशी टीका त्‍यांनी शिनसेनेवर केली.


12 जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी..
2019 मधील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत तयारी करण्याची तयारी प्रकाश आंबेडकर यांनी 5 सप्‍टेंबररोजी दर्शवली होती. परंतु, राज्यात 12 जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी करण्‍यात येईल, असे ते म्हणाले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...