आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी काँग्रेसच्या पाठिंब्याने खासदार, पवारांच्या नव्हे; अॅड. प्रकाश आंबेडकरांचा पलटवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिंब्यावर आपण खासदार बनलो हाेतो, या पवारांच्या वक्तव्यात तथ्य नाही. पवार माझ्या खासदारकीबाबत संपूर्ण: खोटे बोलत आहेत, असा आराेप करत "प्रमोद महाजन यांच्यासाठी त्यांनी राज्यसभेची जागा का सोडली हाेती', याचा पवारांनी खुलासा करावा, असे आव्हान भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 


प्रकाश आंबेडकर हे आपल्या पाठिंब्याने खासदार झाले होते, असा दावा पवार यांनी मागच्या आठवड्यात केला होता. त्यावर सोमवारी आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. आंबेडकर म्हणाले, १९९७ मध्ये आमचा काँग्रेससोबत ४ जागांसाठी समझोता झाला होता. त्या वेळी आम्ही तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याशी बोलणी केली होती. त्यात पवार कुठेही नव्हते. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मुरली देवरा यांनी पवार तुम्हाला भेटायला येणार असल्याचे सांगितले. त्या वेळी पवार राजगृहावर आले होते. मात्र, त्यांनी मला खासदारकीसाठी पाठिंबा दिला नव्हता. १९९९ ला लोकसभा निवडणुका झाल्या. त्या वेळी शरद पवार यांचे सोनिया गांधी यांच्याशी बिनसले. ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. त्याच कालावधीत मी अकोल्यातून लोकसभा लढवली. त्या वेळी शरद पवार यांच्या पक्षाने माझ्याविरोधात बापू सुभाष टोपे हा उमेदवार उभा केला होता. त्यांनी लाखाहून अधिक मते घेतली होती. त्यामुळे मला खासदारकीसाठी पवारांनी पाठिंबा दिला, या पवारांच्या बोलण्यात काहीही तथ्य नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 


काँग्रेसने स्थानिक पक्षांना विचारात घ्यावे 
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देशात महाआघाडी करताना प्रादेशिक पक्षांबरोबरच स्थानिक पक्षांना विचारात घेऊन निवडणुका लढवाव्यात, अशी अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस सोबत आला तरी त्यांच्या उमेदवारासोबत भारिप उमेदवार उभा करायचा की नाही, हे त्या वेळी ठरवू, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.  

 

बातम्या आणखी आहेत...