नागपूर / आंबेडकरांची भाषा ही भाजपला मदतीची, त्यांना आघाडी नकोय; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांंचा आरोप

आंबेडकरांनी आघाडीत यावे, अशी काँग्रेसची प्रामाणिक भूमिका

दिव्य मराठी

Jul 05,2019 09:31:00 AM IST

नागपूर - वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दिलेला ४० जागांचा प्रस्ताव पाहता प्रकाश आंबेडकर आघाडीबाबत अजिबात गंभीर नसल्याचे दिसते. त्यांची भाषा ही भाजपला मदत करणारी आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


आंबेडकरांनी आघाडीत यावे, अशी काँग्रेसची प्रामाणिक भूमिका आहे. पक्षश्रेष्ठींनीही चर्चेची जबाबदारी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांकडे सोपवली आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळून समाजाला न्याय देणे, राज्याला विकासाकडे नेण्यासाठी आघाडी आवश्यक आहे. आंबेडकरांनी पुढाकार घेतल्यास जागावाटपावर चर्चा करता येईल. मात्र, त्यांची भाषा भाजपला मदत करणारी आहे. आम्ही त्यांना भाजपची “बी’ टीम म्हटले तर ते पुरावे मागतात. यात “ए’ ते “झेड’पर्यंत काहीही असू शकते, अशी आम्हाला शंका आहे.

X