आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यादी जाहीर होईपर्यंत काँग्रेसला चर्चेची संधी, अॅड. प्रकाश अांबेडकर; माढ्यात मोरेंना उमेदवारी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज (जि. सोलापूर) - संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी काँग्रेसने आखलेला आराखडा आमच्या समोर मांडला नाही म्हणून त्यांच्याशी आमच्या वाटाघाटी बंद झाल्या आहेत. तरीही उमेदवारांची यादी जाहीर होईपर्यंत चर्चेची दारे खुली असतील, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी सांगितले. वंचित बहुजन मेळाव्यास आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 
सोलापूर लोकसभा लढवण्यासाठी आपल्याला आग्रह होत आहे, त्याचा आपण विचार करत आहोत, असे त्यांनी सांगितले. माढा लोकसभेसाठी माजी आमदार ॲड. विजय मोरे यांचे नाव त्यांनी जाहीर केले. 


या वेळी अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, इतर पक्षांप्रमाणे आमच्याकडे आर्थिक ताकद कमी आहे. त्यामुळे आम्हाला लोकसभेचे उमेदवार लवकर ठरवावे लागत आहेत. ठरवलेल्या उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अवधी असला पाहिजे. बहुजन वंचित आघाडी राज्यातील सर्व ४८ जागांवर उमेदवार देणार आहे. आमचे उमेदवार जाहीर होण्याआधी काँग्रेसने योग्य वाटाघाटी केल्यास त्यांच्याशी आमचे सूत जुळणे नाकारले जाऊ शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी राहुल गांधी पंतप्रधान असावेत, असा काँग्रेसचा आग्रह आहे. परंतु संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी काँग्रेसने कोणत्या प्रकारचा आराखडा तयार केला आहे, ते घटक पक्षांना सांगणे गरजेचे आहे. बहुजन वंचित आघाडीबरोबर एमआयएम यापूर्वीच आलेला आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याशीही आमची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...