maharashtra election / टीव्ही आणि वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत-नवाब मलिक


लोकसभेत मत विभाजनामुळे शिवसेना-भाजपला फायदा झाला

प्रतिनिधी

Sep 09,2019 09:33:21 PM IST

मुंबई- लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो असे सांगून टिव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.


प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही असे सांगितले आहे. यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता नवाब मलिक यांनी आरोप केला आहे.

प्रकाश आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते. त्यांना आघाडी नकोच आहे होती आणि आताही त्यांना वेगळंच लढायचे आहे असेही नवाब मलिक म्हणाले. वंचितमुळे मतविभाजन होवून त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होत असल्याचे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे. जनतेने लोकसभेत जी चुक केली ती चुक पुन्हा विधानसभेत ते करणार नाहीत असेही नवाब मलिक यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी विधानसभेत एकजुटीने लढतील आणि जे मित्रपक्ष सोबत होते ते सर्व घेवून विधानसभा ताकदीने लढवणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

X
COMMENT