आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या माघारीमुळे राज्यात 50 टक्के यशाची खात्री : प्रकाश आंबेडकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या खासगी सर्वेच्या निकालात वंचित आघाडीला ५० टक्के प्रतिसाद दर्शविला आहे. त्यामुळेच त्यांनी माढा मतदार संघातून माघारीचा निर्णय घेतला. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील आम्ही मानताे. त्यामुळे राज्यभरात वंचित आघाडीला यशाची खात्री असल्याचा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. कुटुंबशाही, एका विशिष्ट जातीचे राजकारणाला पर्याय देण्यासाठी वंचित आघाडीतर्फे जात सांगून उमेदवार देत आहाेत. राष्ट्रवादी व कांॅग्रेस स्पर्धेत आहे असे मानत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


वंचित आघाडीच्या जळगाव व रावेर येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव शहरात आयाेजित जाहिर सभेसाठी आंबेडकर आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत हा विश्वास व्यक्त केला. आघाडीतर्फे एमआयएम पक्षाला आैरंगाबाद व उत्तर मध्य मुंबई या जागा साेडण्यात आल्या आहेत. चार मतदार संघ साेडून उर्वरित सर्व मतदार संघातील उमेदवार जाहिर केल्याचे त्यांनी सांगितले.


लाेकशाहीचे सामाजिकरण... 
या पत्रकार परिषदेत सहा उमेदवारांची नावे जाहिर करून आंबेडकर यांनी हे उमेदवार काेणत्या जातीचे प्रतिनिधीत्व करतात हे देखिल स्पष्ट केले. यामागील भूमिका मांडतांना त्यांनी अनेक वर्षांपासून राज्यात आणि देशात नातेवाईकांचे राजकारण, कुटुंबियांचे राजकाण सुरु आहे. त्याला पर्याय देण्यासाठी वंचित आघाडीतर्फे जाणिवपूर्वक  प्रत्येक सामाजाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे घराणेशाही व एक जातीय राजकारणाला पर्याय उभा राहत आहे. त्यातून राजकीय पक्षांचे चारित्र्य बदलावे लागेल. या नाही पण आगामी निवडणुकीत त्याचे पडसाद दिसतील.
 

सर्वांना शिक्षण व स्पर्धामुक्त व्यवस्था...
केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारची असावी. आज युवकांमध्ये सर्वकाही विकत घेतले असल्याने नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यातून कुटुंब, जात, समाज,धर्म या संकुचित विचारात गुरफटला जात आहे.  शासनाचा आपल्या शिक्षणात वाटा आहे, असे वाटले पाहिजे. त्यातून सकारात्मकता वाढेल. आम्ही स्पर्धामुक्त व्यवस्था मानताे. त्यासाठी आजच्या बंॅक सिस्टीमला पर्यायी बंॅकींग सिस्टीम असायला हवी.
  

माेदी लाट दिसत नाही....
लाटांचे अनेक राजकारण पाहिलीत. इंदिरा गांधीची लाट हाेती. त्यानंत व्ही.पी. सिंग आणि २०१४ मध्ये नरेंद्र माेदींची लाट हाेती. मात्र, आता माेदींची लाट दिसत नाही. माेदी सरकारच्या निणर्यांमुळे व्यापारी नाराज झालेले आहेत. त्यांचा राेष आहे. 


कांॅग्रेस आघाडी स्पर्धेत नाही...
वंचित आघाडीला आॅनपेपर अंत्यत आशादायक व अनुकुल वातावरण आहे. गर्दी हाेत आहे. ती मतात देखील परिवर्तीत हाेण्याची खात्री आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व कांॅग्रेस आघाडी स्पर्धेत आहे असे वाटत नाही. कांॅग्रेसच्या अध्यक्षांना नांदेडमधून त्यांनी उमेदवारी करावी की साै. चव्हाण यांनी करावी, हे ठरविता येत नाही. ही स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...