आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅड. प्रकाश आंबेडकर मांडणार कोरगाव भीमा पीडितांची बाजू, आयोगापुढे हजर होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पटेल-मलिक आयोगापुढे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. १ जानेवारीच्या दंगलीतील पीडितांपैकी दोघांची साक्ष येत्या २४ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. त्यासाठी आंबेडकर आयोगापुढे उभे राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची साक्ष होणार आहे. 


१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशतकमहोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित सोहळा आणि त्यानंतर कोरेगाव, सणसवाडी आणि वढू इथपासून राज्यभर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि राज्य माहिती आयुक्त सुमीत मलिक यांची द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली.

 

आयोगापुढे दाखल झालेल्या ४९३ प्रतिज्ञापत्रकांपैकी निवडक साक्षीदारांच्या साक्षी ५ सप्टेंबरपासून सुरू झाल्या आहेत. त्यापैकी ठाण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षी पहिल्या टप्प्यात झाल्या. १ जानेवारीस विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या या मंडळाची बस हल्लेखोरांनी जाळून टाकली होती. मंडळाचे अध्यक्ष तुकाराम आवारे आणि सभासद भास्कर पंडागळे यांची साक्ष येत्या २४ सप्टेंबरला होत आहे. अॅड. आंबेडकर हजर राहणार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...