आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'8 जागांची ऑफर मान्य करणे किंवा बाहेर पडणे हे दोनच पर्याय होते, त्यामुळे आम्ही आमच्या हिताचा निर्णय घेतला'- इम्तियाज जलील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एमआयएम आणि प्रकाश आंबेडकांमध्ये दरी भरण्याची शक्यता कमी झाली आहे. प्रकाश आंबेडकरांनी आघाडी कायम असल्याचे सांगितले तरी तोडगा निघण्याची शक्यता कमीच आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्जियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एमआयएम आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकरांनी दिलेली 8 जागांची ऑफर कधीच मान्य केली जाऊ शकत नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. सध्या आंबेडकरांसोबत कोणतीही चर्चा सुरू नाहीये, तरी आम्ही आशा सोडलेली नाही असेही जलील म्हणाले.जलील म्हणाले, "एमआयएम उद्यापासून स्वतंत्र मुलाखती सुरू करणार आहे. मालेगाव, नांदेड विभागासाठी या मुलाखती असतील. वंचित आणि एमआयएममुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाल्या होत्या, सर्व जाती धर्म एकत्र आले. एमआयएमला भाजपची बी टीम म्हणणारे आता भाजप सोबत आहेत. आंबेडकरांबद्दल आजही आदर आहे मात्र मतभेदांनाही जागा आहे."


पुढे ते म्हणाले, "आंबेडकरांच्या आदेशानुसार आम्ही एमआयएमची 98 जागांची यादी 3 महिन्यापूर्वीच दिली होती. त्यानंतर आम्हाला कळले की 98 जागांवर लढणे शक्य नाही. त्यानंतर आम्ही सर्व्हे करुन कमीत कमी जागा लढवून जास्तीत जास्त विजय मिळवण्यासाठी 74 जागांची यादी पुन्हा पाठवली. पण बरेच दिवस झाले तरी आम्हाला उत्तर मिळाले नाही. या 74 जागांवरदेखील  आम्ही तडजोड करायला तयार होतो. 2 दिवसांचा वेळ देऊनही लवकर उत्तर नाही मिळालं नाही आणि नंतर आंबेडकरांनी मेल पाठवून एमआयएमला 8 जागांवर लढण्यास सांगण्यात आले. आम्ही मागच्या निवडणुकीत 24 जागा लढवल्या होत्या, त्यामुळे यावेळेस 8 जागा लढवणे कदीच मान्य होणारे नाहीये."