आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश साेळंके आमदारकी साेडणार; राजू शेट्टी, संजय राऊतही खट्टू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने नाराज माजलगावचे ‘राष्ट्रवादी’ आमदार प्रकाश साेळंके यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना न्याय मिळत नाही, त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, विधानसभा अध्यक्षांची ते भेट घेणार आहे,’ असे साेळंके म्हणाले. घटक पक्षांना स्थान न मिळाल्याने राजू शेट्टी व इतर नाराज आहेत, तर भाऊ सुनील राऊत यांना डावलल्याने सेना नेते संजय राऊतांनी साेहळ्याकडे पाठ फिरवली.