आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदी सरदेसाई आणि ढवळीकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  •  

पणजी | गोवा विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत (४६) गोव्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर सव्वाआठ तासांनी रात्री १.५० वाजता सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सावंत गोव्याचे ११ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत भाजपला पाठिंबा दिलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 


रविवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घाजाराने निधान झाले. काल त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर सत्ताधारी भाजप आणि सहकारी पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर एकमत होत नव्हते. भाजपचा मित्र पक्ष महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते धवलीकर यांनी स्वतःचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी सूचविले होते. तर आणखी एका सहकारी पक्षाने आपला पाठिंबा पर्रिकरांना होता, भाजपला नाही अशा शब्दात भाजपची कोंडी केली होती. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या चर्चेनंतर सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.

 

बातम्या आणखी आहेत...