आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pranab Mukherjee, Nanaji Deshmukh And Bhupen Hazarika Got Bharat Ratna Award Today

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान, नानाजी देशमुख आणि भूपेंद्र हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताचे माजी राष्ट्रवती प्रणव मुखर्जी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्यात आला. तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक नानाजी देशमुख आणि गायक भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा पुरस्कार प्रदान केला. मुखर्जीहा पुरस्कार मिळवणारे पाचवे राष्ट्रपती आहेत. याआधी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. जाकिर हुसैन आणि व्ही.व्ही. गिरी यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.
 

20 वर्षानंतर दोन पेक्षा जास्त व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. याआधी 1999 मध्ये समाजवादी नेते जयप्रकाश नारायण, सितारवादक पंडित रविशंकर, अर्थशास्त्री डॉ. अमर्त्य सेन आणि स्वतंत्रता सेनानी गोपीनाथ बोरदोलोई यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 

चार वर्षानंतर भारतरत्न देण्यात आला
चार वर्षानंतर भारतरत्न प्रदान करण्यात आलाय. याआधी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि स्वतंत्रता सेनानी आणि बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीचे संस्थापक मदन मोहन मालवीय यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. आतापर्यंत 45 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला होता, आता ही संखया 48 झाली.

 

प्रणल अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्रमंत्री होते
प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 ला पश्चिम बंगालच्या मिरातीमध्ये झाला. 1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीं यांनी त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले. त्यानंतर 1982 मध्ये त्यांना कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री पद मिळाले. 1984 मध्ये राजीव गांधींसोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी नवीन राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पण, नंतर 1989 मध्ये हा पक्षा काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर पीव्ही नरसिम्हाराव यांच्या सरकारमध्ये त्यांना 1991 मध्ये योजना आयोगाचे प्रमुखे पद आणि 1995 परराष्ट्रमंत्रीपद देण्यात आले.

 

तिळकांची प्रेरणा घेऊन समाजसेवेत आले नानाजी
नानाजी देशमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक, समाजसेवक आणि भारतीय जनसंघाचे नेते होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रच्या हिंगोली जिल्ह्यातील कडोली नावाच्य लहानशा खेड्यात 11 ऑक्टोबर 1916 मध्य झाला होता. नानाजी बाळ गंगाधर तिळकांच्या राष्ट्रवादी विचारधारेपासून प्रभावित होऊन समाजसेवा सुरू केली. त्यानंतर संघाचे तत्कालिन सरसंघचालक डॉ. केवी हेडगेवार यांच्या संपर्कात आल्यानंतर संघाशी जोडले गोले. मध्यप्रदेशातील चित्रकूट त्यांची कर्मभूमी बनली.

 

कोलंबिया यूनिव्हर्सिटीत शिक्षणासाठी गेल होते हजारिका
भूपेन हजारिका गायक, गीतकार आणि संगीतकार होते. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 ला असमच्या सादिया जिल्ह्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गुवाहाटीमध्ये झाले. त्यानंतर बनारस हिंदू यूनिव्हर्सिटी (बीएचयू) मधून पॉलिटिकल सायंसमध्ये बीए केले. 1949 मध्ये स्कॉलरशिपवर कोलंबिया यूनिव्हर्सिटीत शिक्षणासाठी गेले. 1936 मध्ये त्यांनी आपले पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. 1939 मध्ये इंद्रमलाटी चित्रपटासाठी त्यांनी दोन गाणे गायले. फक्त 13 वर्षांच्या वयात त्यांनी आपले पहिले गाणे "अग्निजुगोर फिरिंगोति' लिहीले होते. हिंदी चित्रपट "रुदाली और दमन"मधील त्यांचे गोणे खूप लोकप्रिय होते. 1977 मध्ये तांना पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण, 2012 मध्ये पद्म विभूषण (मरणोत्तर)ने सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...