आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या खास व्यक्तीच्या आठवणींनी गहिवरले प्रशांत दामले, भर कार्यक्रमात पाणावले डोळे   

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  कलर्स मराठीवरील “दोन स्पेशल” या कार्यक्रमात अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कवीता लाड-मेढेकर यांनी या आठवड्यात हजेरी लावली. जितेंद्र जोशी यांच्यासोबत दोघांनी दिलखुलास गप्पा मारत बरेच किस्से आणि आठवणी सांगितल्या आहेत. प्रशांत दामले मंचावर आले आणि गाणे होणार नाही असे तर अशक्यच... गप्पांची सुरुवात “मला सांगा सुख म्हणजे” या गाण्याने झाली.
 
या कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांनी पाठिंबा दिल्याचे सांगितले. ‘मला अॅक्टींगला सपोर्ट करणारा कोणी व्यक्ती असेल तर तो सुधीर भट. त्याने सातत्याने मला नाटकात घेतले. त्यामुळे आज जो मी 50-55 वर्षांचा आहे आणि जे काही मिळवले आहे ते या व्यक्तीमुळे. त्याच्यामुळेचे मी इथपर्यंत पोहोचलो आहे,’ असे प्रशांत दामले यांनी म्हटले आहे. सुधीर भट यांच्या विषयी बोलताना प्रशांत दामले भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाचे हजार प्रयोग झाले त्या दिवशी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काढलेला फोटो दाखवला तेव्हा सुधीर भट यांनी अमिताभ बच्चन यांना कोणता प्रश्न विचारला हे प्रशांत दामले यांनी सांगितले.  ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांनी 6 वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. नाट्य क्षेत्रात प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या सुधीर भट यांनी ‘मोरूची मावशी’,  ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘जादू तेरी नजर’, ‘गांधी विरुद्ध गांधी’, ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘चार दिवस प्रेमाचे’ अशा एकूण 75 नाटकांची निर्मिती केली होती. देशा-विदेशात मराठी नाटकांचे प्रयोग करण्यासाठी यांनी बरीच धडपड केली. त्यांच्या अनेक गाजलेल्या नाटकांना युरोप, अमेरिकेतही उत्तम प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...