आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prashant Kishor To Manage AAP Poll Campaign In Delhi Assembly Election Declares Arvind Kejriwal

केंद्रात भाजपला सत्ता मिळवून देणारे प्रशांत किशोर आता केजरीवालांसाठी बनवणार व्यूहरचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 2020 मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामध्ये आम आदमी पक्ष राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांची मदत करणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी यासंदर्भातील घोषणा केली. त्यानुसार, किशोर यांची संस्था इंडियन-पॅक (आयपॅक) आपचा निवडणूक मोर्चा सांभाळणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 67 जागा आपला मिळाल्या होत्या.

2014 सांभाळली मध्ये नरेंद्र मोदींची प्रचार मोहिम
2014 ची लोकसभा निवडणूक प्रशांत किशोर यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि यशस्वी प्रोजेक्ट आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांचीच व्यूहरचना कारणीभूत आहे. यानंतरच त्यांना देशातील सर्वात चाणाक्ष राजकीय व्यूहरचनाकार म्हणून ओळख मिळाली. 2015 मध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपपासून दूर जात नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल (जनता दल युनायटेड/जदयू) साठी बिहार विधानसभा निवडणुकीत काम केले. त्यावेळी जदयू, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडीचा पराभव झाला होता. यानंतर जदयूने प्रशांत किशोर यांना पक्षात राष्ट्रीय उपाध्यक्ष पद दिले. प्रशांत किशोर यांनी 2017 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेससाठी काम केले आणि काँग्रेसची सत्ता आणून दिली. कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. 2017 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत सुद्धा त्यांनी काँग्रेससाठी काम केले होते. परंतु, त्या ठिकाणी भाजपची सत्ता आली.

आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डींना विजय मिळवून दिला
2019 मध्ये झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या संस्थेने वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी काम केले. तसेच निवडणुकीत त्यांना एकतर्फी विजय मिळवून दिला. यासोबतच, महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेसाठी देखील काम केल्याची चर्चा आहे. प्रशांत किशोर सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करत आहेत.