आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्या अा‌‌‌र्थिक परिस्थितीचा उचलला 'भार'; माळरानावर बकऱ्या चारत कसून सराव; मेहनतीच्या बळावर सुवर्णपदकाला गवसणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कौटुुंबिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे प्रशांतला अार्थिक भार पेलावा लागला. यासाठी सातत्याने आई-वडिलांसोबत काम करावे लागते. शिक्षण घेत असतानाच तो माळरानावर बकऱ्या चारण्याचे काम करतो. हे काम करीत असतानाच मिळेल त्या वेळेत वेटलिफ्टिंगचा सराव करीत आहे. 

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांर्गत फैजपूर येथील डी.एन. कॉलेजच्या प्रशांत कोळी या विद्यार्थ्याने कालिकत, केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळात सुवर्णपदक प्राप्त केले. माळरानावर सराव करून प्रशांत याने सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर रावेरच्या वसंतराव नाईक महाविद्यालयातील गोविंदा महाजन या विद्यार्थ्याने कांस्य पटकावले. कालिकत येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा काल पार पडली. यामध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या ५५ किलो गटामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुवर्णपदक प्राप्त केले. प्रशांत कोळी या विद्यार्थ्याने हे पदक प्राप्त केले. तो फैजपूर येथील डी.एन. महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याची या पहिल्याच स्पर्धेतील कामगिरी काैतुकास्पद ठरली. 

 

प्रतिभा असल्याने प्रशांतने या खेळात नेत्रदीपक यश संपादन केले. मात्र, घरच्या अार्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाचा भार पेलणे त्याच्यासाठी कठिण हाेते. याची दखल घेत शैक्षणिक व खेळाचा खर्चदेखील महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा संचालक करीत आहेत. खेळातच करिअर करण्याची त्याची इच्छा असल्यामुळे कसून सराव करतो. यासाठी त्याचे प्रयत्नही लक्षवेधी अाहेत. 

 

सर्वाेत्कृष्ट खेळाडू होण्याची अाता प्रशांत काेळीला संधी 
या स्पर्धा संपल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी भारतातील भारोत्तोलन या खेळ प्रकारातील सर्वाेत्कृष्ट खेळाडूचे नाव जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी प्रशांत कोळी याचे नाव सर्वात आघाडीवर आहे. यानिमित्ताने त्याला येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीयस्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते, अशी माहिती प्रशिक्षण डॉ. मारतळे यांनी दिली. 

 

गोविंदा महाजनने पटकावले कांस्यपदक 
रावेरच्या वसंतराव नाईक महाविद्यालयातील गोविंदा महाजन या खेळाडूने ६१ किलो वजन गटात ७५ खेळाडूंना मात देत एकूण २२७ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. एकाच दिवशी दोन पदकांची कमाई केल्यामुळे कालिकत येथे कबचौउमविचे कौतुक केले जाते आहे. 

 

पास हाेऊन स्वप्नांना दिली गती; अाता गाजवली स्पर्धा 
गतवर्षी बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर प्रशांत खचला होता. भारोत्तोलन या खेळात पटाईत असल्याने त्याला याच्या स्पर्धा गाजवण्याची इच्छा होती, परंतु बारावी नापास झाल्यामुळे तो स्पर्धेत सहभागी होऊ शकत नव्हता. कारण त्याला शालेय स्तरावरील स्पर्धेच्या सहभागात अाता अाडकाठी निर्माण झाली हाेती. मात्र,त्याने मेहनतीच्या बळावर हा पल्लाही यशस्वीपणे गाठला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...