आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prateik Babbar To Tie The Knot With Sanya Sagar, Marriage Date January 22 And 23

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक अडकणार लग्नाच्या बेडीत, सान्या सागरसोबत थाटणार विवाह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर लवकरच लेखक-दिग्दर्शक असलेली त्याची मैत्रिण सान्या सागरसोबत 22 आणि 23 जानेवारीला लखनऊमध्ये होणाऱ्या एका खाजगी समारंभात लग्न करणार आहे. हा सोहळा लखनऊमध्ये सान्याच्या फार्महाऊसमध्ये होणार आहे. यात दोघांचेही जवळचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होणार आहेत. स्वागत समारोहानंतर दोघेही मुंबईमध्ये एक पार्टीही देणार आहेत, ज्यात बॉलीवुडमधील कलाकार उपस्थित राहतील. 

 

एक वर्षांपुर्वी झाला होता साखरपुडा 
प्रतिक बब्बरने गर्लफ्रेंड सान्या सागरसोबत साखरपुडा केला होता. सान्याच्या घरी लखनऊमध्ये हा साखरपुडा पार पडला होता. सान्या आणि प्रतिकने आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. पण नंतर त्यांनी डेटिंग सुरु केली. डेटिंगच्या एका वर्षांनंतर त्यांनी साखरपुडा केला. सान्याने लंडन येथून फिल्ममेकिंगचा कोर्स पूर्ण केला आहे.


साखरपुडा झाल्यानंतर एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक म्हणाला होता की, "सान्या आणि माझ्या कुटुंबियांनी वसंत पंचमीच्या शुभ मुहुर्तावर साखरपुडा करण्याचे योजिले होते. सान्याशिवाय बेस्ट लाईफ पार्टनर माझ्या आयुष्यात असच शकत नाही. देवाने दिलेल्या या क्षणाचा मी आभारी आहे."

बातम्या आणखी आहेत...