आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- निवडणूक येताच राजकारण्यांचे पक्षांतर सुरूच होते. अशातच मुंबई महापिलकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनीदेखील पक्षांतर करून स्वगृही म्हणजेच भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या लॉनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे कमळ परत एकदा हाती घेतले आहे.
मंत्री प्रकाश मेहता यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी भाजपला राम-राम ठोकला होता. पण आता निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी घरवापसी केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत घाटकोपरमधून काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली होती, पण सर्वात श्रीमंत भाजप उमेदवार पराग शाह यांनी त्यांचा पराभ केला होता.
भाजपने लोकसभच्या उमेदवारांची यादी काल जाहिर केली पण ईशान्य मुंबईतील उमेदवारचे नाव अचूनही गुलदस्त्यात आहे. या जागेवर किरीट सोमय्या विद्यमान खासदार आहेत, पण शिवसेनेचा सोमय्यांना विरोध आहे. यामुळेच प्रवीण छेडा हे सोमय्यांचा पर्याय असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.