आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डबुकवड्या !

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवीण शांताराम माळी, जळगाव खान्देशनं पुरनपोयीनं जेवन खान्देशना मानूसच चांगलं पचाडू शकंस, बाकीनास्ले हाई जेवन जड जास. आते आखाजीनं, पोयानं जेवन तुम्हले सांगान गरज नयी. आंबाना रस, पुरनपोयी, भज्या, मुंगवडा, कुल्लाया, तयेलं पापडं (उडीदना, नागलीना, चिकनीना ठोक्या पापड, लाट्या पापड, धव्व्या, पिव्व्या नि आलग आलग रंग ना पापडं) आनि तेन्हा मा महत्त्वानी म्हणजे चमकदार, मसालेदार रश्शी किंवा रसुई. तेल्हे डबुकवड्यास्नी भाजी बी म्हनतंस आनि सुशिक्षित लोक (?) तिले आमटी म्हनाले लागी गयात. आते हाई तरनदार रश्शी नई ऱ्हायनी ते खान्देशना मानूस आर्धा भुक्या ऱ्हाई जास. रश्शीमुळे जेवननं ताट कसं खुलीसन आनि फुलीसन दिखस. एक दिन मन्हाबरोबर शिकनारा मित्र दीपेन्द्र मन्हा घर जेवाले उना. घरमा घुसना आनि मन्ही माय समार वाटी ऱ्हायंती. तेनी देख.. दीपेंद्र : अरे यार, मौसी ये पत्थर पर क्या रगड रही है? मी : आरे, तो फक्त दगड नयी रे. शि-वऱ्होटा शे तो. तेन्हावर रश्शी ना समार (मसाला) वाटायी ऱ्हायना. दीपेंद्र : रश्शी? क्या है ये रश्शी? मी : जेवन करतुस ना तवय सांगसू तुले... आसं सांगीसन दिप्यानं तोंडले कुलूप लावाना अयशस्वी प्रयत्न करा मी. कारण तो उत्तराखंडना व्हता. पन, आम्ही नाशिकले शिकाले सोबत व्हतुत. काही दिन सुट्ट्या व्हत्यान म्हनीसन मी तेल्हे म्हनत, ‘थथा नको जाऊ, आथाज ये.’ आथा म्हनजे शिरपूरले. तेल्हे बजारमा फिराले लयी गवू. बजारमा सुपडा देखात. माल्हे मन्हे, ‘यार, ये झाडू के पास क्या है?’ आते हिंदीमा सुपडाले काय म्हनतंस कोनले माहीत? मीबी गांगरायी गवू. मी म्हनत,‘सुपडा है वो. उससे धान्य पाखडते.’ ‘पाखडते मतलब?’ माले इचाराले लागना. तेल्हे म्हंना, ‘दिप्या, आते गुच्चूप घरे चाल. डोकं नको खराब करू बजारमा.’ मंग आम्ही घर वनूत. हातपाय धुयी जेवनले बठतून. माय खापरवर पुरनपोया टाकी ऱ्हायन्ती. ते देखी म्हने - दीपेंद्र : अरे, वो क्या है? मी : (आते खापरले काय म्हनतंस या इचारमा शून्य नजर करी बस्नू.) उसको खापर बोलते है। आसं सांगी म्हनतं ‘आते गुच्चुप जेवन कर.’ तो नि मी जेवाले लागनूत. दीपेंद्र मिनिटभर भरेल ताटकडे देखतच ऱ्हायना. दीपेंद्र : अरे प्रवीण, इसमें तो मुझे सिर्फ भजिया समझ रही है। ये बाकी क्या है? मी : म्हनतं खाय रे भो ने शे ते. पयलेच बजारमा आर्ध डोकं खायी गया. तरी पन मी आपला खान्देशी पदार्थ सांगाना पुरेपूर प्रयत्न करात. दीपेंद्र : यार, ये सूप बहुत बढिया है टेस्ट में.. मी : रश्शी शे रे भो ती.. दीपेंद्र : हाँ, मुझे और चाहिए पीने को. मी : पे... पे... तुले पटीन तितली पे. (मंग मी तेल्हे चॅष्टी गयी टाकाले लागनू) दीपेंद्र : अरे यार, तुझे पता है ना मैं व्हेज हूं। मी : मंग मी कोठे नॉनव्हेज दी ऱ्हायनू? दीपेंद्र : अरे, तो फिर ये पीस पीस क्यों दे रहा है? मी (डोकाले हात लायी) : भाऊ, डबुकवड्या शेतंस रे या... पुरा घरमा एकच हशा पिकना. तोबी खूप हासना आणि डबुकवड्यास्ले दोन्ही हात गयी डोया फाडी फाडी देखाले लागना. तो म्हने, ‘कसा बनतंस ह्या?’ मी म्हनतं, ‘मन्हा मायनी तीन बोटे-स्माईन कणीक पीठ सोड का रश्शी मा आपोआप तयार व्हस डबुकवडी...’

बातम्या आणखी आहेत...