आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौष पौर्णिमेनिमित्त संगमावर 23 लाख भाविकांचे पवित्र स्नान, संगमाच्या वाळूवर कल्पवास सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कडाक्याच्या थंडीत श्रद्धा व अध्यात्माच्या माघ मेळ्यास आरंभ झाला. शुक्रवारी पौष पौर्णिमेच्या निमित्ताने पहिले पवित्र स्नान होते. पहाटे ६ वाजेपर्यंत २३ लाख लोकांनी गंगा, यमुनेत पवित्र स्नान केले. याबरोबरच संगमनगरीत आता उत्सवाला सुरुवात झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रेल्वे, बस, खासगी वाहनांतून माघ मेळ्यात पोहोचले आहेत. भक्तिभावाने सहभागी झालेल्या भाविकांच्या आेठी 'गंगा मैयाची की जय' असे उद्घोष ऐकायला मिळू लागले आहेत. प्रयागराजमध्ये किमान तापमान १० अंशांहून कमी आहे. थंडीची लाटही सुरू आहे. परंतु भाविकांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कल्पवासींना शुभेच्छा दिल्या. मेळ्यात पोलिस, निमलष्करी दलाचे एकूण ३५०० जवान तैनात आहेत. साधू-संत, कल्पवासींसाठी संगम तटावर शेकडो एकरवर तंबूची अाध्यात्मिक नगरी वसवली आहे.

२१ फेब्रु.पर्यंत चालणार मेळा

  • ०५ पांटुनो पूल गंगा नदीवर वाहतुकीसााठी तयार
  • १६ स्नान घाट गंगा व यमुना नदीवर तयार केले
  • १३ हजार एलईडी दिवे मेळा क्षेत्रात लावले
  • ९० किमीच्या मेळा क्षेत्रात चकर्ट प्लेटचे रस्ते बनवले

श्रद्धा : जप, तप, ध्यान, अनुष्ठान व दानाचे महापर्व म्हणजे माघ मेळा

माघ मेळा म्हणजे जप, तप, ध्यान, अनुष्ठान, दानाचे महापर्व. माघ मेळ्यात आखाडे सहभागी होण्याची परंपरा नाही. माघ महिन्याचे सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी-देवता संगमावर येतात व एक महिना येथे वास करतात. त्याला कल्पवास म्हणतात. तेे गंगा-यमुना व अदृश्य त्रिवेणीत स्नान करतात, अशी श्रद्धा आहे.

व्यवस्था : ६ सेक्टरमध्ये मेळा, १३ पोलिस ठाणी, ३८ चौक्या

मेळा व्यवस्थापन अधिकारी रजनीश मिश्र म्हणाले, माघ मेळा पहिल्यांदाच ६ सेक्टरमध्ये वसला. सुरक्षेच्या दृष्टीने १३ पोलिस ठाणी व ३८ चौक्या तयार केल्या आहेत. १३ अग्निशमन केंद्रे तयार करण्यात आली. १८५ सीसीटीव्ही कॅमेरे,नाइट व्हिजन डिव्हाइसही लावले आहेत. हायटेक ड्रोननेदेखील मेळ्यावर निगराणी.

बातम्या आणखी आहेत...