आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयागराज एका दिवसासाठी झाले जगातील सर्वाधिक लाेकसंख्येचे शहर, दुसऱ्या शाही स्नानासाठी 5 काेटी भाविक 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयागराज| कुंभमेळ्यातील दुसरे शाही स्नान साेमवारी दुर्लभ महाेदय याेगाबराेबर झाले. या स्नानासाठी भाविकांची इतकी गर्दी झाली की ३० हजार जवान कमी पडले. ४१ घाटांवर स्नान करण्यासाठी लाेकांना दाेन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. कुंभमेळ्यातील अधिकारी विजय किरण अानंद यांनी सांगितले की, रात्री १२ वाजता स्नान सुरू झाले. साेमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जवळपास ५ काेटी लाेक स्नानासाठी पाेहोचले. मकर संक्रांतीला झालेल्या पहिल्या स्नानापेक्षा ही अडीचपट जास्त संख्या हाेती. प्रयागराज कुंभमेळ्यात एक दिवस जगातील सर्वाधिक लाेकसंख्या असलेले शहर झाले. जपानमधील टाेकियाेत ३.८ काेटी लाेक राहतात. 

 

कुंभमेळ्यातील गर्दी जगातील काेणत्याही इव्हेंटपेक्षा दुप्पट 
७१ वर्षांनंतर कुंभमेळ्यात साेमवती व माैनी अमावास्या एकत्र अाली. यापूर्वी महोदय योग ९ फेब्रुवारी १९४८ राेजी अाला हाेता. 
संगम घाटावर सोमवारी सर्वात अाधी महानिर्वाणी व अटल आखाड्याने स्नान केला. त्यानंतर दुसरे अाखाडे अाले. सर्व अाखाड्यांना ४० मिनिटे दिली गेली. 

- हे सर्वात माेठे धार्मिक आयोजन अाहे. यात १ दिवसात ५ काेटी लाेक अाले. यापूर्वी झालेल्या सर्वात माेठा इव्हेंटपेक्षा कुंभमेळ्यातील संख्या दुप्पट अाहे. 
- कुंभानंतर जगातील सर्वात माेठे धार्मिक आयोजन अरबमध्ये हाेणारे हज अाहे. येथे २०१३ मध्ये ३ काेटी लाेक अाले हाेते. 

संगमाचे हे छायाचित्र 'दिव्य मराठी'चे फोटोजर्नलिस्ट ताराचंद गवारिया यांनी हेलिकॉप्टरमधून घेतले. सोमवारी दुसऱ्या शाही स्नानासाठी ५ काेटी भाविक पाेहोचले. 
 

बातम्या आणखी आहेत...