आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यात सिलिंडर स्फोटामुळे किचनचा मंडप जळाला, मंगळवारपासून सुरू होणार 49 दिवसांचा सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्यापासून सुरू होणारा कुंभमेळा 49 दिवस चालणार आहे. 
  • जगातील या सर्वात मोठ्या तात्पुरत्या उभारलेल्या शहरात 15 कोटी लोक येणार. 
  • 10 कोटी लोकांना मोबाईलवर कुंभ मेळ्याचे आमंत्रण पाठवले आहे.

प्रयागराज - कुंभमेळा परिसरात सोमवारी दुपारी दिगंबर आखाड्यात दोन एलपीजी सिलिंडरचा ब्लास्ट झाल्याने आग लागली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या मजत आणि बचाव कार्यासाठी दाखल झाल्या. या घटनेच किचनचा तंबू जळाला आहे. मात्र कोणलाही इजा किंवा भाजले नसल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर आखाड्यात उपस्थित साधु संतांना बाहेर काढले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या अग्निकांडाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. 


आधी केवळ 20 चौरस किलोमीटरमध्ये लागायचा मेळा 
जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि अध्यात्मिक मेळा मंगळवारपासून मकरसंक्रातीला सुरू होईल. 15 जानेवारी ते 4 मार्च या 49 दिवसांच्या काळात हा मेळा चालणार आहे. यामध्ये सुमारे13 ते 15 कोटी लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. 14 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत तीन दिवस सर्व 12 वी पर्यंतच्या शाळा कॉलेज बंद ठेवली जातील. 


सरकारने सांगितले की, प्रथमच हा कुंभमेळा 45 चौरक किमीच्या परिसरात पसरलेला आहे. पूर्वी हा 20 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला असायचा. या कुंभमेळ्यात 50 कोटी खर्च करून 4 टेंट सिटी तयार करण्यात आल्या आहेत. त्यांची नावे कल्पवृक्ष, कुंभ कॅनव्हास, वैदिक टेंट सिटी, इन्द्रप्रस्थम सिटी अशी आहेत. कुंभमेळ्यादरम्यान प्रयागराजमध्ये जगातील सर्वात मोठे तात्पुरत्या स्वरुपाचे शहर वसवले जाते. सरकारी आकडेवारीनुसार कुंभमेळ्याच्या आयोजनावर आतापर्यंत 4300 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यावेळी कुंभमेळ्याची थीम - स्वच्छ कुंभ आणि सुरक्षित कुंभ अशी आहे. सरकारने 10 कोटी लोकांना मोबाईल एसएमएस करत त्यांना कुंभ मेळ्यासाठी आमंत्रित केले आहे. 


6 मुख्य स्नान, तीन शाही स्नान
भारतात चार ठिकाणी कुंभ मेळा आयोजित केला जातो. त्यांची नावे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक आहेत. यापैकी प्रत्येक ठिकाणी 12 वर्षांनंतर कुंभमेळा होत असतो. प्रयागमध्ये दोन कुंभ मेळ्यांमध्येस6 वर्षांच्या अंतराने अर्धकुंभही होतो. प्रयागराजमध्ये यापूर्वीचा कुंभमेळा 2013 मध्ये झाला होता. 2019 मध्ये असलेला हा अर्ध कुंभ आहे. पण युपीसरकार याला कुंभमेळाच म्हणत असून प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभ 2025 मध्ये होईल. यंदाच्या कुंभमेळ्यात शाही स्नान 15, 21 जानेवारी तसेच 4,10,19 फेब्रुवारी आणि 4 मार्चला आहेत. 


कधी असतो कुंभमेळा 
प्रयागराज येथील कुंभमेळा मकरसंक्रांतीच्या दिवशी सुरू होतो. त्यावेळी सूर्य आणि चंद्र वृश्चिक राशीमध्ये आणि बृहस्पती मेष राशीमध्ये प्रवेश करतात. 

 
अख्यायिका 
कुंभचा अर्थ कलश असा होतो. त्याचा संबंध समुद्र मंथनादरम्यान सर्वात शेवटी निघालेल्या अमृत कलशाबरोबर आहे. देव आणि असूर जेव्हा एक मेकांच्या हातातून अमृत कलश हिसकावत होते त्याचवेळी त्यातील काही थेंब धरतीवरील तीन नद्यांत पडले. ज्याठिकाणी हे थेंब पडले त्याठिकाणी कुंभमेळा आयोजित केला गातो. या नद्या म्हणजे, गंगा, गोदावरी आणि क्षिप्रा आहेत.  

 

इतिहास 
प्रयागमधील कुंभमेळ्याचा लेखी इतिहास गुप्तकाळात चौथ्या ते सहाव्या शतकात आढळतो. चिनी प्रवासी ह्वेनसांग याने पुस्तकात कुंभचा उल्लेख केला. ते इसवीसन 617 ते 647 पर्यंत भारतात होते. प्रयागमध्ये राजा हर्षवर्धनने सर्वकाही जान करून राजधानीत ते परतले होते, असा उल्लेख आहे. 


कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये.. 
>> 690 किमी लांब पाण्याची पाईपलाईन पसरवण्यात आली आहे. 
>> 800 किमी लांब वीजेचा सप्लाय पोहोचवला आहे. 
>> 25 हजार स्ट्रीट लाइट लावले आहेत. 7 हजार स्वच्छता कर्मचारी तैनात आहेत
>> 20 हजार पोलिस आहेत. 4 पोलिस लाइनसह 40 ठाणे आणि 3 महिला ठाणे तसेच 62 पोस्ट तयार केलेले आहेत. 
>> 45 चौरस किमी परिसरात पसरला आहे कुंभमेळा  
>> 600 स्वयंपाक घरे, 48 मिल्क बूथ आणि 200 एटीएम 
>> 4 हजार हॉट स्पॉट लावण्यात आले आहेत. 
>> 1.20 लाख बॉयो टॉयलेट तयार केले आहेत.  
>> 800 स्पेशल रेल्वे सुरी करण्यात आल्या आहेत. 
>> 300 किमी रोड तयार करण्यात आले आहेत. 
>> 40 हजार एलईडी लावण्यात आले आहेत. 
>> 5 लाख वाहनांसाठी पार्किंग एरिया तयार करण्यात आला. 
 

 

बातम्या आणखी आहेत...