आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prayer Of Gandhiji At The Temple In Batra Village Of Odisha Has Been Since 1974, Problems Get Solved After Taking His Oath Over The Village Dispute.

ओडिशातील भत्रा गावात 1974 पासून होते गांधीजींच्या मंदिरात आरती, गावातील वादावर त्यांची शपथ घेतल्यानंतर निघतो तोडगा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर : ओडिशातील संबलपूरलगत २ हजार लोकसंख्येचे भत्रा गाव आहे. या गावाला भटारा असेही म्हटले जाते. येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मंदिर आहे. मंदिरात दररोज सकाळ -संध्याकाळ पूजा होते व रामधून ऐकू येते. गेल्या ४६ वर्षांपासून लोक गांधीजींना देवाच्या रूपात पूजतात. गांधी मंदिर म्हणजे गावातील असे व्यासपीठ जेेथे घरातील वादापासून शेजाऱ्यापाजाऱ्यांची भांडणे मिटवली जातात. येथील तरुणांना गुन्हे व नशा न करण्याची शिकवण दिली जाते. नव्या सुनेला सासरी पाऊल ठेवण्याआधी गांधी मंदिरात त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणले जाते. गांधीजींच्या विचारांचा या गावावर इतका पगडा आहे की, आपसातील सहकार्यामुळे अस्पृश्यतेसारख्या समस्या मुळांपासून नाहीशा केल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर हातात तिरंगा ध्वज असलेल्या भारतमातेची मूर्ती आहे. येथेच ओडिशातील आराध्य दैवत श्री जगन्नाथांची मूर्तीही आहे. गावातील ८३ वर्षीय कालिया वाघ येथे रोज पूजा करतात. मंदिराचा पाया रचलेले ९३ वर्षीय माजी आमदार अभिमन्यूकुमार येथे रोज येतात. दररोज एक तास रामधून होते. या वेळी सर्व गाव हजर असते. गावातील एक ज्येष्ठ नागरिक टिकेश्वर छुरिया व बनमाली कंुभारत यांंना गांधीजी माणसाच्या रूपातील देव वाटतात. भत्रा येथील सर्व घरांमध्ये गांधीजींचा फोटाे आहे. आमच्या सुख-दु:खात ते सहभागी असतात. मी १५-१६ वर्षांचा होतो तेव्हा सर्वांनी मिळून या गावात मंदिराची उभारणी केली. गावातील ओमिया छुरिया यांनी सांगितले, गावात कोणीही नशा करत नाही. त्यामुळे वादही कमी होतात.

अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी १९२८ मध्ये येथे आले होते गांधीजी

भत्राचे पहिले आमदार अभिमन्यू कुमार यांनी मंदिराचा पाया रचला. लोकांना सोबत घेऊन त्यांनी ११ एप्रिल १९७४ रोजी या मंदिराची उभारणी केली. त्यांचे चिरंजीव प्रमोदकुमार म्हणाले, गांंधीजी १९२८ मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आमच्या गावात आले होते. लोकांना मंदिरात पूजा करण्याची व प्रवेशाची परवानगी नव्हती. तेव्हा वडिलांनी गांधीजींचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला.
 

बातम्या आणखी आहेत...