• Home
  • Business
  • Pre booking of Samsung Galaxy Note 10 as well as Note 10 Plus starts in India

Mobile / भारतात सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट-10 तसेच नोट-10 प्लसची प्री बुकिंग सुरू 

नोट-10 ची किंमत 69,999 रुपये तर नोट-10 प्लसची 79,999 रुपये 

दिव्य मराठी

Aug 09,2019 02:59:50 PM IST

नवी दिल्ली - सॅमसंगने गॅलेक्सी नाेट-१० आणि गॅलेक्सी नोट-१० प्लस स्मार्टफोनची भारतात प्री बुकिंग सुरू झाली आहे. गॅलेक्सी नोट-१० प्लसची किंमत ७९,९९९ रुपये आहे, तर गॅलेक्सी नोटची किंमत ६९,९९९ रुपये आहे. ग्राहक या दोन्ही स्मार्टफोनला सॅमसंगची अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएमवर बुक करू शकतील. भारतीय ग्राहकांना गॅलेक्सी नोट स्मार्टफोन २३ ऑगस्ट रोजी मिळणार आहे. त्यासाठी या फोनला ८ ते २२ ऑगस्टदरम्यान बुक करावे लागणार आहे.


बॅटरी क्षमता ४३०० एमएएच
पहिल्यांदाच गॅलेक्सी नोट दोन स्क्रीन साइजमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहील.
गॅलेक्सी नोट-१० प्लसमध्ये ६.८ इंच स्क्रीनसह सिनेमॅटिक डिस्प्ले आहे.
गॅलेक्सी नोट-१० मध्ये ६.३ इंचांचा सिनेमॅटिक इनफिनिटी डिस्प्ले आहे.
गॅलेक्सी नोट - १० आणि नोट-१० प्लस मध्ये पॉवरफुल एस पेन आहे.
दोन्हीमध्ये बॅटरी ४३०० एमएएचची मिळेल.


नोट-१० ची खरेदी केल्यास गॅलेक्सी अॅक्टिव्ह वॉचवर १० हजारांची सूट
गॅलेक्सी नोट-१० आणि गॅलेक्सी नोट-१० प्लसची प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनीच्या वतीने १९,९९० किमतीची गॅलेक्सी अॅक्टिव्ह वॉच ९९९९ रुपयांत मिळेल, तर एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्डने रिटेल आऊटलेट आणि सॅमसंग स्टोअरवरून बुकिंग केल्यास ६,००० रुपये कॅशबॅक मिळेल.


५१२ जीबीपर्यंत स्टोरेज क्षमता
गॅलेक्सी नोट-१० प्लस दोन श्रेणीमध्ये उपलब्ध अाहे. एक १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह आणि दुसरा १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे.


फोनच्या स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने एक टीबीपर्यंत वाढवता येईल. तर गॅलेक्सी नोट-१० केवळ ८ जीबी रॅम आणि ३५६ जीबी स्टोअरेजसह मिळेल. यामध्ये मायक्रो एसडी कार्डचा स्लॉट नसेल.

X