आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फर्मेशन/ एक्स गर्लफ्रेंड प्रिती सिमोस करणार नाही कपिल शर्माचा कमबॅक शो, म्हणाली- मी माझ्या शोमध्ये व्यस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क. कपिल शर्माची एक्स-गर्लफ्रेंड प्रिती सिमोसला आगामी सीजन 'द कपिल शर्मा शो'साठी अप्रोच करण्यात आले आहे. चॅनल तिला क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून घेण्यास उत्सुक आहेत. परंतु तिने नकार दिला अशा चर्चा सध्या सुरु आहेत. याविषयी आता प्रिती बोलली आहे. 
 
प्रिती म्हणाली - मी माझ्या शोमध्ये व्यस्त आहे 
आमच्या वेबसाइटशी बोलताना प्रितीने सांगितले की, या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही. हे सर्व वायफळ आहे. मी माझ्या शोमध्ये व्यस्त आहे. चॅनल आणि माझ्यामध्ये अशा प्रकारचा काहीच संवाद झालेला नाही. द कपिल शर्मा शोमागे प्रितीची आयडिया होती असे बोलले जाते.

कपिल आणि सुनील ग्रोवरमध्ये झालेल्या भांडणानंतर तिने शो सोडला. यानंतर तिने आपले पब्लिकेशन ओपन केले. याचे नाव लिटिल फ्रोडो आहे. हे द ड्रामा कंपनी सारखे शो बनवते. 

आगामी प्रोजेक्टविषयी आम्ही प्रितीला विचारले तर ती म्हणाली की, आता आम्ही नॉन कॉमेडी जॉनरवर काम करतोय. हे काम इनीशियल स्टेजवर आहे. सर्व काही फायनल झाल्यावर आम्ही अनाउंसमेंट करु. कपिल पुन्हा टीव्हीवर कमबॅक करणार आहे. असे त्याने नुकतेच ट्विट करुन सांगितले होते. 

बातम्या आणखी आहेत...