आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत गर्भवती पत्नीने पतीला किस करताना जीभ चावून तोडली; कारण ऐकूण बसेल धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत रनहोला परिसरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे राहणाऱ्या एका 22 वर्षीय पत्नीने आपल्या पतीची चक्क जीभ चावून तोडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत रविवारी एका युवकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रनहोला परिसरात त्याच्या गर्भवती पत्नीने शनिवारी रात्री किस करताना हे कृत्य केल्याचे आरोप आहेत. पत्नीने आपल्या पतीसोबत असे का केले त्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. 


पतीच्या लुक्समुळे दिली अशी शिक्षा...
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शेजाऱ्यांकडून चौकशी केली, तेव्हा या घटनेचे धक्कादायक कारण समोर आले आहे. शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, महिला आपल्या पतीसोबत खुश नव्हती. कारण, आपला पती चांगला दिसत नाही असे तिला वाटत होते. या दोघांमध्ये रोज प्रत्येक गोष्टीवर वाद आणि भांडण व्हायचे. पीडित पती एक स्ट्रीट आर्टिस्ट आहे. पती-पत्नीमध्ये शनिवारी सुद्धा जोरदार भांडण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, त्याच दिवशी दोघांमध्ये समेट घडला. यानंतर शनिवारी रात्री उशीरा पत्नीने आपल्या पतीला किस करताना त्याची निम्म्याहून अधिक जीभ आपल्या दातांनी चावून तोडली. 


पुन्हा बोलेल याची शक्यता कमीच...
पोलिसांनी पीडित पतीच्या वडिलांना यासंदर्भात माहिती दिली. पतीला सफदरगंज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या जीभेवर शस्त्रक्रिया करून जोडण्याचा प्रयत्नही केला. परंतु, यानंतरही तो बोलणार याची शक्यता फार कमी आहे अशे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान, आरोपी महिला 8 महिन्यांची गर्भवती आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिचा जबाब नोंदवला जात आहे. या दोघांचा विवाह नोव्हेंबर 2016 मध्ये झाला होता.

बातम्या आणखी आहेत...