आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती अल्पवयीन GF ला पळवून नेले, मित्रांकडून घडवला सामूहिक बलात्कार; मग केली इतकी निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर - सोबत जगण्या-मरण्याची आश्वासने देऊन एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्याबरोबर शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. परंतु, ती जेव्हा गर्भवती झाली तेव्हा नराधमाचा खरा चेहरा समोर आला. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीचा विक्षिप्त मृतदेह सापडला आहे. मृतदेहाची अवस्था पाहून अख्ख्या गावात घबराट पसरली आहे. ही अल्पवयीन मुलगी गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता होती. या प्रकरणात आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्रांना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. 


आधी घरातून पळवले
सागर जिल्ह्यातील बिलहरा गावात राहणारा अमन याचे गेल्या वर्षभरापासून एका 17 वर्षीय मुलीसोबत अफेअर सुरू होते. त्याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याच संबंधातून तिला गर्भधारणा झाली. गर्भवती झाल्याने तिने अमनवर लग्नासाठी दबाव टाकला. यावरूनच दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. काही दिवसांतच अमनने तिला पळवून लग्न करण्यासाठी तयार केले. तसेच घरातून पळवूनही नेले. 


मग घडले असे काही...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अमनला पोलिसांनी अटक केली. त्यानंतरच त्याने आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली. अल्पवयीन मुलगी जेव्हा घर सोडून अमनसोबत राहायला आली, तेव्हा तिला अमनचा खरा चेहरा दिसून आला. सतत लग्नाच्या दबावावरून तो इतका संतापला होता की त्याने आपल्या मित्रांकडून त्या मुलीवर सामूहिक बलात्कार घडवला. यानंतर कुऱ्हाडाने तिचा निर्घृण खून केला. इतके पाशवी कृत्य करताना तिच्या पोटात बाळ आहे याचाही विचार त्याने केला नाही. पीडित मुलीचा मृतदेह विक्षिप्त अवस्थेत रविवारी गावात सापडला. दरम्यान पोलिसांनी त्याचे इतर दोन मित्र आणि घटनेतील आरोपी गोविंद पटेल आणि अमित पटेलला देखील अटक केली.

 

घरातील पत्रातून उघडले हत्येचे रहस्य
पोलिसांनी सांगितले, की घरातून पळून जाताना अल्पवयीन मुलीने एक पत्र लिहून ठेवले होते. त्यामध्येच तिने आपल्या प्रेम संबंधांचा, अमनचा आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाचा उल्लेख केला होता. याच पत्राच्या आधारे तिच्या कुटुंबियांनी पोलिस ठाणे गाठले. तसेच अमनच्या विरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अमनला अटक केली तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आले. अमन आणि त्याच्या मित्रांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई केली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...