आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगालमध्ये संघ स्वयंसेवकासह गर्भवती पत्नी, 6 वर्षीय मुलाचीही गळा चिरुन हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुर्शिदाबाद - पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या जियागंज भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) स्वयंसेवक, त्याची ८ महिन्यांची गर्भवती पत्नी आणि ६ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली. तिघांच्या शरीरावर चाकूच्या हल्ल्याच्या खुणा होत्या. मुलाचा रुमालाने गळा आवळण्यात आला होता. पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.

पोलिसांनी सांगितले की, अज्ञात लोकांनी हा हल्ला केला. या घटनेमागे कुठल्याही धार्मिक किंवा राजकीय कारणाची शक्यता नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कुटुंबाच्या संपत्तीशी संबंधित प्रकरणे आणि खासगी संबंधांची चौकशी केली जात आहे. प्रकाश पाल (३५), पत्नी ब्यूटी (२८) व मुलगा अंगद (६) यांची मंगळवारी दुपारी हत्या करण्यात आली होती. घरात सामान अस्ताव्यस्त आढळले. त्यावरून मृत्यूच्या आधी प्रकाश व हल्लेखोरांत संघर्ष झाला असावा, असे संकेत मिळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...