आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांची गरोदर महिला आणि तिच्या पतीची केली हत्या; आंतरजातीय विवाह केल्यामुळे नाराज होते कुटुंबीय, एकाच आठवड्यातील दुसरी घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई -  तमिळनाडूच्या थूथूकुडी येथे आंतरजातीय विवाह केल्यामुळे तीन महिन्यांची गर्भवती आणि तिच्या पतीची हत्या करण्यात आली. टी सोलेराजन (वय 24 वर्षे) आणि पत्नी एस पेचियाम्मल ऊर्फ जोथी (वय 21 वर्षे) यांची गुरुवारी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. पोलिसांनी युवतीच्या वडिलांना अटक केली आहे. तमिळनाडूत एकाच आठवड्यात अशाप्रकारची ही दुसरी घटना घडली आहे. 25 जून रोजी कोईम्बतूर येथे एका दाम्पत्याची कथित रित्या हत्या करण्यात आली होती. 

 

मुलीच्या वडिलांवर संशय, पोलिसांनी केली अटक

मयत युवक सोलेराजन परयार आणि युवती पल्लार समाजाती होती. दोघेही एका सॉल्ट पॅन कंपनीत काम करत होते. पोलिसांना सांगितले की, जोथीचे आई-वडील या नात्याच्या विरोधात होते. यानंतर युवक आणि युवतीने आपले घर सोडले. यावर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केले होते. युवकाच्या आई-वडीलांनी मात्र या लग्नाला विरोध केला नव्हता. घटनेनंतर सोलेराजन परिवावाराने गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी संशयित म्हणून मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...