आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्या काळातली \'सावित्री\': स्वत: 8 महिन्यांची गर्भवती असताना नवऱ्याची केली दिवसरात्र सेवा, त्याचा जीव वाचवण्यासाठी विसरली स्वत:च्या वेदना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- ही गोष्ट आहे एका अशा 'सावित्री'ची जी यमाशी भांडून नाही परंतु मृत्यूच्या दारातून नवऱ्याला परत घेऊन आली. ती स्वत: 8 महिन्यांची गर्भवती होती. भोजावास येथील रहिवासी 24 वर्षांच्या  इंद्रादेवीवर चहुकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

नवऱ्याला घेऊन सहा दिवस फिरली 5 दवाखाने

आपल्या मुलांसोबत इंद्रा आणि तिचा नवरा नरसीराम जत्रा पाहायला गेले असताना एका गाडीने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत दोघे जण रस्त्यावर पडले, त्या वेळी इंद्रा स्वत:ला सावरत नरसीरामला सावरण्यासाठी त्याच्याजवळ गेली. या धडकेत त्याच्या मानेला गंभीर इजा झाली होती. ताबडतोब लोकांच्या मदतीने ती नवऱ्याला भोजावास येथील दवाखान्यात घेऊन गेली, परंतु तिथे उपचार न झाल्याने त्याला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तिथे नरसीरामवर प्राथमिक उपचार करून त्याला तिसऱ्या दवाखान्यात पाठवण्यात आले. परंतु तिथेदेखील उपचार न झाल्याने परत त्याला जोधपूरला हलवण्यात आले.

 

जिथे प्रेम आहे तिथे चमत्कार तर होणारच

अपघात झाल्यानंतर सहा दिवस आपल्या नवऱ्याला घेवून वेगवेगळ्या दवाखान्यात फिरत होती. 10 सप्टेंबरला इंद्रा एमडीएम दवाखान्यात पोहचली, तिथे तात्काळ विभागात त्याला भरती करण्यात आले.  ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टर महेंद्र टाक यांनी सांगितले की, या माणसाचा एक्सरे बघितल्यानंतर हा जिवंत राहणे कठीण आहे, आणि यावर उपचार केल्यानंतर देखील याचे हाथ पाय पुर्ववत होतील याची आम्हाला शंका होती. परंतू आम्ही नरसीरामला पाहीले तेव्हा एखादा चमक्तार झाला की काय? असे वाटले.

 

डॉक्टर टाक यांनी नरसीरामचा सर्वायकल स्पाइनचा एक्सरे काढला परंतू तो देखील जुन्या एक्सरेसारखाच निघाला. शेवटी त्यांनी एमआरआय करून 12 सप्टेंबरला त्याच्यावर उपचार करण्यास सुरूवात केली. डॉक्टरांशी बोलताना त्यांनी सांगितले की, नरसीरामचे ऑपरेशन करणे खूपच कठीण काम होते. त्यासाठी त्याच्या डोक्याला छेद करून मशिनने हाडाला वजन लटकावून ठेवले होते. जवळपास सहा आठवड्यांपर्यंत त्याला या अवस्थेत ठेवण्यात आले.

या दरम्यान इंद्रा सतत नरसीरामची सेवा करत होती.

 

पतीच्या प्रेमाखातर पडला वेदनांचा विसर

12 ऑक्टोबरला इंद्राला प्रसूती वेदना चालू झाल्या त्यावेळी तिच्या सोबतीला कोणीच नव्हते.वेदना सहन होत नसल्यामूळे डॉक्टरांना विचारून ती एकटीच उम्मेद दवाखान्यात पोहचली, तिथे तिला भरती करून घेण्यात आले. असे म्हणतात की, 'एखाद्यावर संकट येते तेव्हा सगळ्याच बाजूने येते' इंद्रासोबत देखील असेच काहीसे झाले. 12 ऑक्टोबरला तिच्या नवऱ्याचे ऑपरेशन होते आणि त्याच दिवशी इंद्राने आपल्या तिसऱ्या मुलिला जन्म दिला. प्रसूतीनंतर थोड्या वेळाने तिने डॉक्टरांना फोन करून नवऱ्याची विचारपूस केली. मुलिला जन्म देवून 24 तास देखिल नसेल झाले, अशावेळी लगेच आपल्या सगळ्या वेदना विसरून आपल्या तान्हुलीला घेवून ती आपल्या नवऱ्याला पहायला गेली. इंद्राचे तिच्या नवऱ्यावरील प्रेम पाहून डॉक्टरदेखिल भारावून गेले. आम्ही तुझ्या नवऱ्याची सगळी काळजी घेऊ असे सांगून त्यांनी तिला घरी पाठवून दिले.   

 

देवदूत बनून डॉक्टरांनी केली मदत

ऑपरेशनवेळी नरसीरामच्या जवळ कोणीच नसल्याकारणाने डॉक्टरांनीच त्याची काळजी घेतली. वेळेवर त्याला गोळ्याऔषधे देणे, खाऊपिऊ घालने अशा वेगवेगळ्या प्रकारे डॉक्टरांनी एखाद्या देवदूतापसारखी त्याची मदत केली.

 

 

बातम्या आणखी आहेत...