आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकू भोसकून केली गरोदर महिलेची हत्या, इमरजंसी ऑपरेशन करून डॉक्टरांनी वाचवले पोटातील बाळाचे प्राण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटेनच्या राजधानीत हल्लेखोरांनी गरोदर महिलेची चाकू भोसकून हत्या केली. महिला 8 महिन्यांची गरोदर होती. शनिवारी रात्री घटनेची सूचना मिळाल्यानंतर पॅरामिडिक्स स्टाफ घटनास्थळी दाखल झाले आणि इमरजंसी ऑपरेशन करून महिलेची डिलीव्हरी केली आणि पोटातील बाळाला बाहेर काढले. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या बाळाची प्रकृती नाजुक आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयिताना ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, दक्षिण लंडनच्या क्रॉयडन परिसरात शनिवारी रात्री पोलिसांना मॅरी(26) जखमी अवस्थेत मिळाली होती. डॉक्टरांच्या म्हणन्यानुसार, मॅरी 8 महिने गरोदर होती. उपचारादरम्यान कार्डिक अरेस्ट आल्याने तिचा मृत्यू झाला. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितल की, महिलेला रुग्णालयात आणण्यापूर्वीच इमरजंसी ऑपरेशन करून तिच्या पोटाताली बाळाला बाहेर काढले होते.

 

पोलिस जाणून घेत आहेत कारण
इंस्पेक्टर मिक नॉरमनने सांगितले की, दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोघांची चौकशी करून हत्येमागचे कारण जाणून घेतले जात आहे.