आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ​pregnant Women Folic Acid Food Information In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरोदरपणात महिलांना 50 टक्के फॉलिक अॅसिडची गरज असते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी 7 ते 13 जानेवारीपर्यंत नॅशनल फॉलिक अॅसिड अव्हेअरनेस विक साजरा केला जातो. याचा उद्देश गरोदरपणात फॉलिक अॅसिडबाबत महिलांना जागरुक करण्याचा आहे. हे पोटात वाढणाऱ्या बाळामध्ये कंजेनाइटल डिफेक्टला थांबवण्यास मदत करतो. यामुळे गरोदरपणात फॉलिक अॅसिडयुक्त पदार्थ खाण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 


कडधान्य 
यात फाॅलिक अॅसिड, बायोटिन आणि पोषक खनिजे असतात. यात फायबर्सचे प्रमाण अधिक असते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये असे एन्जाइम असतात जे प्रथिनांचा अमिनो अॅसिड, फॅटला फॅट अॅसिड आणि कार्बोहायड्रेटचे साखरेत आणि स्टार्चमध्ये रुपांतर करते. यामुळे पचन व्यवस्थित होते. 


अख्खे धान्य 
आहारामध्ये कार्बोहायड्रेटचा समावेश केल्यास गरोदरपणादरम्यान होणारी गुंतागुंत कमी होते. गव्हापासून तयार होणारा ब्रेड, ब्राउन ब्रेड, राइस, कॉर्न, ओट आणि असा आहार घ्यावा ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त अाहे. दिवसातून एक वेळा तरी अख्खे धान्य खावेच. या वस्तूंमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. या वस्तू टॉक्सिन्स दूर करण्यातही मदत करतात. 


फळ 
संत्री, एवेकोडा आणि आंब्यामध्ये व्हिटाॅमिन ए आणि सी आहे. हे फळ फॉलिक अॅसिडचे चांगले स्रोत आहे. या प्रकारचे द्राक्षांमध्ये व्हिटॉमिन ए, फोलेट, पोटॅशियम आणि सोडियम असते. याला फळांच्या स्वरुपातच खावे. नाहीतर फळांचा रस घ्या किंवा सॅलेड खा. 


हिरव्या पालेभाज्या 
हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयरन, अँटीऑक्सीडेंटस आणि फॉलिक अॅसिड असते. हे बाळाच्या संपूर्ण विकासासह गभर्वती महिलेमधील रक्ताची कमी होण्यापासून बचाव करते. गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या जसे पालक, मेथी फॉलिक अॅसिडचे चांगले स्त्रोत आहे.