आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पातूर येथील घाटात ट्रकच्या धडकेने गर्भवती महिला ठार, पती जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर- तालुक्यातील चिंचखेड येथील घाटात शुक्रवारी १० ऑगस्टला सकाळी ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक गर्भवती महिला ठार झाली असून,या दुर्घटनेत तिचा पती जखमी झाला. दरम्यान पतीला अकोल्यात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. वैशाली सतीश सोमटकर (२५) रा. मिर्झापूर, ता. मालेगाव, जि. वाशीम असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे पती सतीश ज्ञानबा सोमटकर (३०) हे किरकोळ जखमी झाले आहे. 


मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथील रहिवासी सतीश सोमटकर हे पत्नी वैशालीसह शुक्रवारी १० ऑगस्टला दहा वाजताच्या सुमारास पातूरमार्गे अकोला येथील दवाखान्यात दुचाकी क्रं. एम.एच. ३७ एन ०५५१ ने येत असताना पातूरच्या घाटात बंद पडलेल्या कंटेनरमुळे समोरून येणाऱ्या वाहनांना रस्ता देण्यासाठी सतीश सोमटकर यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली; मात्र त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाशीम येथील ट्रक क्रं. एम एच ३७ पी ५१५१ च्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने त्याने सोमटकर यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात वैशाली सोमटकर या ट्रकच्या मागील चाकात आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सतीश सोमटकर गंभीर जखमी झाले. अपघातात ठार झालेली महिला गर्भवती होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. 


या घटनेची माहिती पातूरचे ठाणेदार डी.सी.खंडेराव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी १०८ रुग्णवाहिकेचे चालक सचिन बारोकार यांनी जखमी सतीश सोमटकर यांना अकोला येथे उपचारासाठी नेले. मृत वैशाली यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोल्याला पाठवण्यात आला. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून, घटनास्थळाचा पंचनामा करुन ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पातूर करीत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आर. जे. ०६ जी.ए. ४०५४ क्रं.चा ट्रेलर हा बंद अवस्थेत पातूर जवळील चिंचखेड येथील घाटात उभा आहे. हा ट्रेलर जर येथे उभा नसता तर कदाचित ही दुर्घटना टळली असती, अशी चर्चा घटनास्थळी सुरु होती. 

बातम्या आणखी आहेत...