आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीत गरोदर विवाहितेची आत्महत्या, पैशासाठी केला जात होता छळ, पतीसह दीर अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- वेल्डिंगचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये आणण्याचा पतीचा तगादा, शारीरिक-मानसिक छळास कंटाळून परळीत मनीषा घुगे या ५ महिन्यांच्या गरोदर विवाहितेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पतीसह दीर, सासू, सासरा, जाऊ या पाच जणांवर गुन्हा नोंद केला. जोपर्यंत सासरच्या लोकांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा माहेरच्या लाेकांनी घेतला. पोलिसांनी शेवटी पती सुदर्शन आणि दीर सदाशिव यांना अटक केल्यानंतर ऐन संक्रांतींच्या दिवशी मंगळवारी इंदपवाडीत दुपारी अंत्यसंस्कार झाले. 

 

इंदपवाडी येथील केशव मुंडे यांची मुलगी मनीषाचा विवाह केज तालुक्यातील होळ येथील रहिवासी येथील केशव घुगे यांचा मुलगा सुदर्शन याच्याबरोबर २६ फेब्रुवारी २०१२ रोजी झाला होता. वर्षभरात त्यांना एक मुलगी झाली. सुदर्शन वेल्डिंगचा व्यवसाय करत असल्याने तो सध्या परळीतील शिवाजीनगर भागात राहत आहे. टोकवाडी येथील प्लॉटवर वेल्डिंग व्यवसाय करण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये आण म्हणून तो पत्नीचा छळ करत होता. मनीषा पाच महिन्यांची गरोदर असतानाही त्रास वाढतच गेल्याने शेवटी तिने १४ जानेवारी रोजी शिवाजीनगर येथील राहत्या घरी साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. पती सुदर्शन व त्याचा मोठा भाऊ सदाशिव या दोघांना अटक केल्यानंतरच नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

 

पाच जणांवर गुन्हा : 
मृत मनीषाचा भाऊ हरिदास मुंडे यांनी संभाजीनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मनीषाचा पती सुदर्शन घुगेसह सासरा केशव घुगे, सासू कुसुमबाई घुगे, दीर सदाशिव घुगे, जाऊ सुरेखा घुगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...