आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: ट्रकने चिरडल्याने गर्भवती ठार, पोटातून अर्भक बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रस्ता ओलांडणाऱ्या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ही महिला जागीच ठार झाली. या महिलेच्या पोटावरून चाक गेल्याने अर्भक बाहेर आले. गुरुवारी (दि. १६) वडाळा गावात रात्री दहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड केली. पोलिसांनी हस्तक्षेप केला असताना पोलिस वाहनांवर दगडफेक करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळागावातील इरोम इरफान शेख (१९) ही नऊ महिन्यांची गर्भवती महिला नैसर्गिक विधीसाठी जात असताना रस्ता ओलांडत हाेती. याच वेळी वडाळागावाकडे जाणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली. यात डोके व पाेटास मार लागल्याने ती जागीच ठार झाली. नऊ महिन्यांच्या अर्भकाचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

 

संतप्त नागरिकांनी ट्रक फोडला
काही वेळातच पोलिस घटनास्थळी पोहाेचले. पाेलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता पोलिस वाहनावरही दगडफेक करण्यात आली. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक नारायण न्याहळदे यांनी नागरिकांची समजूत काढली. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...