आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींना दत्तक घेऊन विसरली प्रीती झिंटा, त्यांचा खर्च उचलत नाही आणि भेटायलाही येत नसल्याचा होतोय आरोप 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. प्रीती झिंटाने 10 वर्षापुर्वी म्हणजेच 2009 मध्ये 34 मुलींना दत्तक घेतले होते आणि त्यांचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली होती. पण आता वृत्त आहे की, प्रीती आपल्या या दत्तक घेतलेल्या मुलींना विसरली आहे. ती कधीच त्यांची विचारपूस करायला जात नाही आणि त्यांचा खर्चही देत नाही. उत्तराखंडाच्या ऋषिकेशमध्ये शीशम झाडी येथील मदर मिरेकल स्कूलच्या संस्थापिका शाइला इत्तेफाम यांनी सांगितल्यानुसार, 34 मुलींचे पालन पोषम आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे वचन देऊन प्रिती आता विसरली आहे. 


- शाइला म्हणते की, प्रीती अनेक वर्षांपासून शाळेतही आलेली नाही. तिच्या वागण्यामुळे स्कूल मॅनेजमेंट नाराज आहे. 
- लग्नापुर्वी 2009 मध्ये प्रितीने आपल्या 34 व्या वाढदिवशी शाळेत शिकणा-या विद्यार्थिनींना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी तिला परवाणगी देण्यात आली होती. तिने अनाथ मुलींना दत्तक घेतले होते. लग्नानंतर ती आपल्या पतीसोबत येथे आली होती. शाइना म्हणते की, काही वर्षापुर्वी ती शाळेत आली, तेव्हा फक्त मुलींसोबत फोटो काढून निघून गेली. 


 

 

बातम्या आणखी आहेत...