आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिफीच्या टॉप 25 लिस्टमध्ये सामील झाली प्रीती झिंटा, 13 कोटी लोकांनी पाहिली WOW GIF

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः GIF सर्च इंजिन कंपनी जिफीने सर्वाधिक बघितल्या गेलेल्या 25 लूप व्हिडिओंची यादी जाहीर केली आहे. प्रीती झिंटा ही एकमेव बॉलिवूड स्टार आहे जिने या यादीत स्थान मिळवले आहे. यादीनुसार,13 कोटीहून अधिक लोकांनी प्रीतीचा 'एक्साइटेड' जिफ पाहिला आहे. बॉलिवूड अभिनेत्रीव्यतिरिक्त, कीनु रीव्स, खालेद, निक जोनास यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलेब्सची नावे यात आहेत. 2016 मधील एका अहवालानुसार दररोज 100 कोटींपेक्षा जास्त जीआयएफ फाइल्स शेअर  केल्या जातात.


2018 मध्ये रिलीज झालेल्या 'भैय्याजी सुपरहिट' मध्ये अखेरची दिसलेली प्रीती झिंटा जिफीवर बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. इतकेच नाही तर ती तिचा जीआयएफ रिलीज करणारी बॉलिवूडची पहिली सेलिब्रिटी आहे. याबद्दल आनंद व्यक्त करत प्रीती म्हणाली की, 'जिफीच्या टॉप 25 यादीत स्थान मिळवणं ही आश्चर्याची बाब आहे. मला डिजी ऑस्मोसिस आणि चाहत्यांचे आभार मानते.' प्रीतीने सांगितले की, सुरुवातीला यामागील कल्पना केवळ चाहत्यांसोबत जुळण्याची होती. मी या यशाने खूप आनंदित आहे.

  • काय आहे जिफी...

जिफी हे जीआयएफ डेटाबेस इंटरनेट प्लॅटफॉर्म आहे. जेथे यूजर्स त्यांच्या पसंतीचे जीआयएफ व्हिडिओ शोधू शकतात आणि त्यांना त्यांच्या आवडत्या सोशल मीडियावर शेअर करू शकतात. 2017 मधील अहवालानुसार जिफीचे दररोज 200 दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत.

बातम्या आणखी आहेत...