आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Workout video viral: 43 व्या वर्षीही फिट आहे प्रिती, असा आहे तिचा डायट प्लान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: प्रिती झिंटाने नुकताच सोशल मीडियावर एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती एक्सरसाइज करताना दिसतेय. प्रिती 43 वर्षांची झाली आहे, परंतू अजूनही ती फिट आहे. 31 जानेवारी, 1975 रोजी हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये जन्मलेल्या प्रितीने बॉलिवूडसोबतच तेलुगु, पंजाबी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे. खुप कमी लोकांना माहिती असेल की, सर्वात पहिले ती लिरिल साबनच्या जाहिरातीत दिसली होती. यानंतर प्रितीने 'दिल से' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तिने सोल्जर', 'क्या कहना', 'मिशन कश्मीर', 'हर दिल जो प्यार करेगा', 'ये रास्ते हैं प्यार के', 'कल हो ना हो', 'कोई मिल गया', 'चोरी-चोरी चुपके-चुपके', 'सलाम नमस्ते', 'वीर-जारा', 'जानेमन', 'इश्क इन पेरिस', 'कभी अलविदा ना कहना' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. प्रिती झिंटाच्या एका फॅनने तिला ट्विटरवर तिच्या फेव्हरेट वर्कआउटविषयी विचारले होते. याचे उत्तर देताना तिने डायट, एक्सरसाइज आणि झोपण्याविषयीचा सल्ला दिला होता. 


जाणून घ्या प्रिती झिंटाचा खास डाय प्लान आणि वर्कआउट रुटीन- 

 

बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रितीचा वर्कआउट रुटीन 
प्रितीला वर्कआउटपुर्वी वॉक करणे आवडते. ती एक्सरसाइजपुर्वी जवळपास एक तास ट्रेडमिलवर चालते. तिच्या वर्कआउट रुटीनमध्ये योगा, रनिंग आणि स्विमिंगचा समावेश आहे. यासोबतच जिममध्ये घाम गाळते. प्रिती नेहमची आपले वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

 

प्रिती झिंटाचा डायट प्लान 
प्रिती बेस्ट वर्कआउटसोबतच आपल्या डायटकडे विशेष लक्ष ठेवते. ती मानते की, जे लोक डायटवर कंट्रोल करु शकतात, त्यांच्यासाठी कोणताही वर्कआउट करणे चांगले असते. प्रितीने डायटप्लानमध्ये सांगितले की, ती ब्रेकफास्ट करणे विसरत नाही. तिच्या डायट प्लानमध्ये जास्तीत जास्त व्हिटॅमिन्स, कॅल्शियम आणि प्रोटीनचा समावेश असतो. ती ताज्या फळांनी सकाळची सुरुवात करते. डिनरमध्ये भाज्यांचे सूप प्यायला तिला आवडते. यासोबतच शुगर आणि ऑयली पदार्थांपासून दूर राहते. ती दिवसभरात खुप पाणी पिते. 

 

बातम्या आणखी आहेत...