प्रेमयोगातूनही होऊ शकते ईश्वरप्राप्ती

धर्म डेस्क, उजैन | Update - May 24, 2011, 06:24 PM IST

सा:या जगात योगाचा प्रभाव वाढतो आहे. परंतु योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम नव्हे. योगाची व्याप्ती मोठी आहे.

  • prem-yog-god

    सा:या जगात योगाचा प्रभाव वाढतो आहे. परंतु योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम नव्हे. योगाची व्याप्ती मोठी आहे. प्रेमालाही योग म्हटले गेले आहे, हे बहुतेकांना माहिती नसते. ज्ञानयोग, भक्तीयोग आणि प्रेमयोगाच्या आधारे ईश्वरापर्यंत पोचता येते तसे प्रेमयोगाच्या माध्यमांतूनही ईश्वरापर्यंत पोचता येते.

    प्रेम करणे ही बाब वाटते तितकी सोपी नाही. आणि हा सर्वोच्च आनंद देणारा अनुभव विनामूल्य थोडाच मिळेल, त्यासाठी सर्वोच्च त्यागाची तयारी पाहिजे. आपले व्यक्तित्त्व, विचार करण्याची पद्धत, आवडी निवडी सोडाव्या लागतील, तेव्हा कुठे खरे प्रेम मिळेल. संत कबीर म्हणतात, प्रेम मंडईत विकत मिळत नाही की शेतात उगवता येत नाही. प्रेमाचे हे अनमोल पीक हृदयात पिकते आणि हृदयच याचा आस्वाद घेते.

    स्त्री आणि पुरुष हे जग चालविणारे दोन महत्त्वाचे घटक आहेत. जोवर दोन्ही घटक वेगवेगळे आहेत तोवर जगाचा गाडा चालण्ेा शक्य नाही. जग थांबून जाईल. सर्व काही नष््ट होऊन जाईल. प्रेमच या दोन घटकांना जोडतं. हे प्रेम शारीरिक असेल, सांसारिक असेल, ½ाले या प्रेमाची उंची ईश्वरीय प्रेमाएवढी असणार नाही, परंतु त्या ईश्वरीय प्रेमच्या निकट मात्र निश्चितच पोहोचेल.Trending