Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Premanand Rupeshwale died, the funeral in Mumbai today

आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रेमानंद रूपवते कालवश, मुंबईत आज अंत्यसंस्कार

प्रतिनिधी | Update - Aug 05, 2018, 12:34 PM IST

निवारी सायंकाळी अल्पशा आजाराने मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. स्वादूपिंडाच्या कर्करोगाने ते आजारी होते.

  • Premanand Rupeshwale died, the funeral in Mumbai today
    अकोले - आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते, विचारवंत व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त तसेच बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त प्रेमानंद दादासाहेब रुपवते उर्फ बाबुजी (७२) यांचे शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. स्वादूपिंडाच्या कर्करोगाने ते आजारी होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रविवारी दुपारी ४ वाजता मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी तसेच माजी मंत्री आणि आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व थोर विचारवंत तथा अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे संस्थापक विश्वस्त दादासाहेब रुपवते यांचे प्रेमानंद हे ज्येष्ठ सुपुत्र व माजी शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांचे ते जावई होत.
    अत्यंत अभ्यासू, मनमिळावू आणि हजरजबाबी प्रभावी नेते म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते. त्यांनी युनोच्या शांतता समितीचे प्रतिनिधित्व केले होते. जागतिक कॉन्फरन्समध्ये ते सहभागी झाले होते.

Trending