Home | National | Other State | Premi Premika Return Home After 15 days Panchayat Give Punishment in Pratapgarh Uttar Pradesh

गावकऱ्यांसमोर प्रेमी युगुलाला बनवले कोंबडा, 15 दिवसानंर घरी परतली तर पंचायतने सुनावली शिक्षा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 12:46 PM IST

एक तास बनवले कोंबडा,एकच हट्ट करत होते दोघे

 • Premi Premika Return Home After 15 days Panchayat Give Punishment in Pratapgarh Uttar Pradesh

  प्रतापगड(उत्तप्रदेश)- पंचायतने प्रेमी युगलाला उठाबशासोबत कोंडबे बनण्याची शिक्षा सुनावली. या प्रेमी युगुलाच्या शिक्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या दोघांना गावकऱ्यांसमोर एक तास कोंबडा बनण्याची शिक्षा दिली. सदरील घटना प्रतापगड जिल्ह्यातील महेशगंज तालुक्यातील गुजवर गावात घडली आहे. एस.पी. एस. आनंद यांनी याप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.


  तीन मुलांची आई आहे महिला
  मिळालेल्या माहितीनुसार शिक्षा मिळालेली महिला तीन मुलांची आई आहे आणि ती 15 दिवस तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती घरी परतल्यावर तिच्या घरच्यांनी तिला घरात घेण्यास नकार दिला. त्यानंतर पंचायत बोलवण्यात आली आणि त्यात तिला तालिबानी शिक्षा सुनावण्यात आली. कुटुंबाच्या अब्रुसाठी त्यांनी शिक्षा स्वीकार केली. लाठीच्या जोरावर ग्रामस्थांनी त्यांना 1 तास कोंबडा बनवले.


  एकच हट्ट करत होते दोघे
  शिक्षेनंतर त्या दोघांनी लग्न केल्याचे सांगितले. त्यासोबतच आता सोबत राहायचे असल्याचे म्हणाले. त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील त्यांना परवानगी दिली आहे.

Trending